प्रयागराज कुंभपर्व २०२५
संतांवर विरोध करण्याची वेळ न येऊ देण्यासाठी प्रशासनाने कृती करावी ! – संपादक
प्रयागराज (उत्तरप्रदेश)– नास्तिकतावादी निधर्मी लोक कुंभमेळ्यात येऊन कोट्यवधी हिंदु भाविकांच्या श्रद्धेचा अनादर करत आहेत. देवतांचे विडंबन करत आहेत. कोट्यवधी भाविक येथे अमृत स्नानाला येत असतांना येथे येऊन नास्तिकतावाद्यांचे हिंदुविरोधी प्रचार करण्याचे धाडस कसे होते ? हे एक षडयंत्र तर नाही ना ? कुंभमेळ्यात येऊन गोंधळ घालण्याचे त्यांचे नियोजन आहे का ?, यांकडे कुंभमेळा प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. येथे त्यांना स्थान देऊ नये. नागा साधूंनी त्यांच्या पद्धतीने नास्तिकत्यावाद्यांना विरोध केला आहे; मात्र संतांवर विरोध करण्याची वेळ येऊच नये,यासाठी प्रशासनाने कृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली.
🌊🏞️ “Calling Kumbh Mela superstition is an atheist conspiracy!” – @SG_HJS @HinduJagrutiOrg
⚠️ Demand for Action – The administration must take steps to prevent opposition against saints. 👮🏻♂️
नागा साधु l महाकुंभ l कुंभ मेला #SanatanPrabhatAtKumbh https://t.co/ztmBEsd2bX pic.twitter.com/pN2lap9XrX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2025
सध्या तीर्थराज प्रयागराज येथीले चालू असलेल्या महाकुंभपर्वात १६ जानेवारी या दिवशी नास्तिकतावादी लोक कुंभमेळा हा अंधश्रद्धा असल्याचा प्रचार करत होते. हे निदर्शनास येताच नागा साधूंनी नास्तिकतावाद्यांना चोप दिला. यावर प्रतिक्रिया देतांना श्री. सुनील घनवट बोलत होते.
#MahaKumbh2025
🚩 क्या कुंभ मेला पाखंड है?
‘महाकुंभ पाखंड है’ जैसे अपप्रचार करने वाले विधर्मियों के खिलाफ का हिन्दू जनजागृति समिति ने कड़ा विरोध जताया है !✊ प्रशासन से मांग :
इस गंभीर मामले की जांच की जाए और विधर्मियों को कुंभ मेले में प्रवेश की अनुमति न दी जाए ! pic.twitter.com/PZWHsnnXSe— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 17, 2025
ते पुढे म्हणाले,
‘‘महाकुंभमेळा हा कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे असतांना येथे येऊन कुणीतरी हिंदु धर्माच्या विरोधात बोलत आहे. कुंभमेळा म्हणजे अंधश्रद्धा आहे, असे म्हणत आहेत. हे म्हटल्यानंतर येथील नागा साधू आणि इतर संत यांनी त्यांच्या पद्धतीने त्याला विरोध केला आहे. प्रश्न असा आहे की, कोट्यवधी भाविकांचा हा कुंभमेळा असतांना कुंभमेळा ही अंधश्रद्धा आहे, असे कुणी कसे म्हणू शकतो ? बकरी ईदच्या दिवशी कुणी तेथे जाऊन सांगत नाही की, बकरी ईद अंधश्रद्धा आहे. ख्रिसमसच्या दिवशी मेणबत्ती पेटवल्यानंतर ‘ही अंधश्रद्धा आहे’ असे कुणी सांगत नाही; पण कुंभमेळ्यात येऊन मात्र हिंदु धर्माविरुद्ध गरळओक केली जाते.’’