Menu Close

‘मुंबई-हावडा एक्सप्रेस’मध्ये प्रवाशांना सक्तीने हलाल चिकन देत असल्याचे उघड

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांची ‘एक्स’द्वारे मागणी !

  • अन्य धर्मियांचे लांगूलचालन करत हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा अधिकार भारतीय रेल्वेला कुणी दिला ?
  • हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर रेल्वे मंत्रालयाने कारवाई करावी ! – संपादक 
श्री. सुनील घनवट

मुंबई (महाराष्ट्र) – मी १५ जानेवारी या दिवशी आय.आर्.सी.टी.सी. (भारतीय रेल्वे खाद्य सेवा आणि पर्यटन महामंडळ) ‘मुंबई-हावडा एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२३२२) मधून प्रवास करत असतांना, भोजनासाठी प्रवाशांनी मांसाहारी पदार्थ मागवले होते. तेव्हा प्रत्येक प्रवाशाला हलाल चिकन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. मागणी घेतांना प्रवाशांना ‘तुम्हाला कोणता मांसाहारी पदार्थ हवा आहे?’, असे विचारून सक्तीने हलाल चिकन देण्यात येत आहे. ही पुष्कळ गंभीर गोष्ट आहे.

‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या अधिकृत गाड्यांमध्ये झटका चिकन उपलब्ध नाही. हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट का केले जात आहे ? यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, हे त्वरित थांबवावे आणि संबंधित अधिकार्‍यांवर रेल्वे मंत्रालयाने कारवाई करावी, असे मत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘एक्स’द्वारे व्यक्त केले आहे.

रेल्वे कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे !

मुसलमान प्रवाशांना हलाल मांस लागते, तर हिंदु प्रवाशांनी झटका मांस मागितल्यास ते उपलब्ध करून देणार का ? बहुसंख्य प्रवासी हिंदू असतांना त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती का ? असे प्रश्न रेल्वेच्या कर्मचार्‍यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

Related News