त्रिशूर (केरळ) – आदिशंकर अद्वैत आखाडा यांच्या वतीने केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यात तिरुविल्वामला या ठिकाणी भारतपुषा नदीच्या काठावर केरळ कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. ११ आणि १२ जानेवारी या २ दिवसांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक साधू-संन्याशांनी भाग घेतला. कार्यक्रमाची सांगता भारतपुषा नदीच्या आरतीने करण्यात आली. विश्वशांती आणि पर्यावरणाचे संरक्षण अशा उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, तसेच समाजकल्याण कार्य करणार्या व्यक्ती, अशा २५ जणांचा सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे प्रतिनिधी म्हणून केरळमधील समितीचे साधक श्री. नंदकुमार कैमल यांचा महामंडलेश्वर स्वामी प्रभाकरानंद सरस्वती यांच्या हस्ते श्री वराहमूर्ती देवाचे चित्र, तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिष्ठित हिंदु साधू-संत, अधिवक्ता, लेखक अशा १५० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.