कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
कोल्हापूर (महाराष्ट्र) – विशाळगडावर अद्यापही अनेक अतिक्रमण शिल्लक आहे. तेथे असलेल्या दर्ग्याची मोजणी करून याचे मूळ बांधकाम आणि अतिक्रमण यांची मोजणी करण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली आहे; मात्र यावर शासनाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. नुकताच शासनाने ३१ मे अखेर सर्व गडांवरील अतिक्रमणे काढण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा, गड अतिक्रमणमुक्त होईपर्यंत तो पर्यटकांना खुला करण्यात येऊ नये, गडावर होणारा उरूस कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी हिंदु आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढण्यात येत आहे. गडावरील समाधी-मंदिरे, तसेच अन्य गोष्टींच्या संदर्भात मी ‘इस्टिमेट’ काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर कार्यवाही चालू आहे, असे जिल्हाधिकार्यांनी आंदोलकांना सांगितले.
या वेळी नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, हिंदु एकता आंदोलनाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, श्री. राजू जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आशिष लोखंडे, मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद आणि श्री. महेंद्र अहिरे यांसएकताह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.