Menu Close

महाकुंभक्षेत्रातील धर्मसंसदेत श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवण्याची गर्जना !

वक्फ बोर्ड रहित करून संपूर्ण भारतात गोहत्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी !

‘धर्म संसदे’तील व्यासपिठावर उपस्थित असलेले संत-महंत

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवून हिंदूंच्यात चेतना जागृत करावी, देशातील रस्त्यांच्या वाटेत मशीद, क्रबस्तान, मदरशांचे झालेले अतिक्रमण सरकारने त्वरित काढावे, संपूर्ण भारतात गोहत्यांवर प्रतिबंध घालून तिला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा दिला पाहिजे, तसेच इस्लामी वक्फ बोर्डाला पूर्णतः रहित करावे, अशी गर्जना येथे पार पडलेल्या ‘धर्मसंसदे’त करण्यात आली.

कुंभक्षेत्री २३ जानेवारी या दिवशी श्रीकृष्णजन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने सेक्टर १९ मधील शंकराचार्य मार्गावरील श्री बाबानगर आखाडा येथे सकाळी १० वाजता ‘विराट धर्म संसद’ पार पडली. या वेळी व्यासपिठावर महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद सरस्वती महाराज, श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराचे मुख्यवादी पंडित दिनेश शर्मा (फलाहारी), संसदेचे आचार्य रमाकांत गोस्वामी, राष्ट्रीय मुख्य संरक्षक श्री. वेदप्रकार कटियार, महंत महोहिनी शरण महाराज आदी संत, महंत उपस्थित होते.

महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘धर्मांधांकडून भारताचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तेथे हिंदूंवर अनन्वित अत्याचार चालू आहेत. तेथे आतापर्यंत १६ लाख हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. बांगलादेशाप्रमाणे भारतात हिंदूंची तशी स्थिती न होण्यासाठी हिंदूंनी जागृत होऊन संघटित होणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांच्या भरवशावर हिंदूंनी अवलंबून न रहाता स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. निधर्मी आणि धर्मांध सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात मुसलमानांची संख्या लक्षणीय वाढत आहे, हिंदू अल्पसंख्य होत आहेत. त्यामुळे येत्या १० वर्षांत हिंदूंनी जागृत होऊन सनातन धर्मासाठी लढण्यासाठी सिद्ध न झाल्यास  भारताचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही.’’

‘आपल्यासमवेत कुणी तरी आहे’, असा विश्‍वास साधूंनी हिंदूंमध्ये निर्माण करावा ! – आचार्य रमाकांत गोस्वामी

आचार्य रमाकांत गोस्वामी म्हणाले, ‘‘योगी आदित्यनाथ सनातन धर्म आणि तीर्थक्षेत्र यांचे संरक्षण करत आहेत. त्याप्रमाणे सर्व आखाड्यांतील संतांनी तसे केले पाहिजे. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कोणत्या आखाड्यांचे किती योगदान आहे ? या आखाड्यांतून साधूंच्या वतीने हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कोणते कार्य केले जात आहे, हे पाहिले पाहिजे, तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात नागा साधू आहेत, तर मग आपल्यासमवेत कुणीतरी आहेत, असा विश्‍वास हिंदूंच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. यासाठी याविषयाचा प्रचार केला पाहिजे.’’

इतर संत-महंत यांचे मार्गदर्शन…

प.पू. बालकृष्ण महाराज म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाची जन्मभूमी हिंदूंची आहे आणि ती हिंदूंची रहाण्यासाठी हिंदूंना संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये हिंदुतत्वनिष्ठ आणि सनातनी हिंदूंनी सहभागी व्हावे.’’ प.पू. बाबाजी कर्मयोगी म्हणाले, ‘‘तन, मन आणि धन अर्पण करून श्रीकृष्णाची जन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंनी धडपड केली पाहिजे.’’ योगी स्वामी गगनगिरी महाराज म्हणाले, ‘‘हिंदूंची गावे सुरक्षित राहिली नाहीत. गोरक्षण केले पाहिजे.’’

हिंदूंनी संघटित होऊन सनातन धर्म रक्षणासाठी कटीबद्ध व्हावे !

महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘धर्मसंसदे’च्या व्यापिठावरून राजकीय चर्चा करून त्याचा राजकीय आखाडा कुणीही बनवू नये. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक संत, महंत, भाविक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतात. त्यांच्यामुळे गोष्टी घडल्याचे सांगितले जाते; मात्र ज्या वेळी हे दोघे नसतील, त्या वेळी हिंदूंची दुर्देशा काय होईल ? हिंदूंचे संरक्षण आणि त्यांना आश्रय देणारा अन्य कोणताही देश नसल्याने हिंद महासागरात जाऊन हिंदूंना जीव द्यावा लागेल. यासाठी हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सर्व आखाडे येथील संत, महंत, साधक, भाविक यांनी संघटित येऊन सनातन हिंदु धर्म रक्षणासाठी कटीबद्ध झाले पाहिजे.’’

धर्मसंसदेत झालेले ठरावे असे…

१. श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवून हिंदूंच्यात चेतना जागृत करणे.

२. ‘व्यासपीठ अनेक हिंदू एक’ या सिद्धांतावर चालून न्यायालयात विद्वानांची संख्या निश्‍चित केली पाहिजे.

३. रस्त्याच्या वाटेत मशीद, क्रबस्तान यांचे झालेले अतिक्रमण सरकारद्वारे मुक्त करावे.

४. सनातनचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्व हिंदूंची सुरक्षा सुनिश्‍चित केली पाहिजे.

५. संपूर्ण भारतात गोहत्या कायदा लागू करून गायीला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा दिला पाहिजे.

६. इस्लामी वक्फ बोर्डाला पूर्णतः रहित करावे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News