हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !
सांगली (महाराष्ट्र) – ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. ही निवेदने देण्यात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
१. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री अभिजित कोडग, गणेश सगरे, अमित कवठेकर, सुरेश टेंगले, विशाल ओलेकर, मंगेश चव्हाण, शुभम होसमठ उपस्थित होते.
२. पलूस येथे निवासी नायब तहसीलदार आस्मा मुजावर यांना, तसेच साहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अधिवक्ता अविनाश युवराज वडार, धर्मप्रेमी श्री. शरद विलास पाटील, श्री. प्रसाद हरिदास येसुगडे (नांगरे) आणि समितीचे श्री. भीमराव खोत उपस्थित होते.
३. कवठेमहांकाळ येथे विविध शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू, असे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी सांगितले.
४. मिरज येथील उपविभागीय कार्यालयात उत्तम दीघे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी व्यापारी सेनेचे श्री. पंडित (तात्या) कराडे, सर्वश्री संतोष शहापूरकर, प्रथमेश साठे, आयुष पोळ, हरगे, सनातन संस्थेच्या सौ. स्नेहा पुजारी, डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले या उपस्थित होत्या. मिरज येथील विविध शाळा-महाविद्यालयांतही हे निवेदन देण्यात आले.
५. विविध ठिकाणी फलक लिखाणाद्वारे जागृती करण्यात आली.