राजवाडा पोलिसांकडून जुजबी स्वरूपाची कार्यवाही करून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !
- एखादा पुरो(अधो)गामी नेता अथवा तथाकथित विचारवंत यांना धमकी मिळाली असती, तर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तत्परतेने कृती केली असती; मात्र येथे श्री. महेश उरसाल हे हिंदुत्वनिष्ठ असल्यामुळेच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला.
- यावरून पोलीस हिंदुत्वनिष्ठांना कशी दुजाभावाची वागणूक देतात, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : येथील बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांना सत्यजित हंबीरराव महाडिक या तरुणाने भ्रमणभाषवरून अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्याविषयी श्री. उरसाल यांनी २५ डिसेंबरला राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी जुजबी स्वरूपाची कार्यवाही करून या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट केला आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सत्यजित महाडिक आणि त्याचा सूत्रधार यांना अटक करण्याची मागणी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. पोलिसांची कारवाई जुजबी स्वरूपाची असून सत्यजित महाडिक हा यातून मोकाट राहून श्री. उरसाल यांच्यावर आक्रमण करण्याची शक्यता आहे.
२. सत्यजित याला श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणाांवर स्वतःच्या लहान मुलीचे डोके ठेवून नमस्कार करायचा होता; मात्र ‘गर्भगृहात सुरक्षेच्या दृष्टीने कोणालाच सोडता येत नाही’, असे श्रीपूजकाने त्यांना सांगितले. तथापि या गोष्टीचा राग धरून ३ मासांनंतर प्रथमच सत्यजित याने भ्रमणभाषवरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
३. सत्यजित याने १ सहस्र कार्यकर्ते घेऊन श्री महालक्ष्मी मंदिरातील गर्भगृहात घुसणार असल्याची धमकी दिली आहे. हे मंदिर सुरक्षा नियमावलीला आव्हान आहे.
४. महाडिक यांनी श्री. उरसाल यांना भेटून ‘तू मंदिराच्या आंदोलनात सहभागी व्हायचे नाही’, तसेच भ्रमणभाषवरून ‘तू सतत श्रीपूजकांच्या बाजूने का उभा रहातोस ? तू जिथे असशील तेथून उचलून नेऊन मारणार आहे’, अशी धमकी दिली.
५. सत्यजित यांचे वडील आणि काका हे पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील निवृत्त झालेले पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे पोलिसांनी सत्यजित याच्या विरोधात नरमाईची भूमिका घेतली आहे का ? तसेच सत्यजित याच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करूनही पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतलेली नाही.
६. सत्यजित हा ब्राह्मण, मराठा आणि बहुजन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
७. सत्यजित याने श्री. उरसाल यांनी यापुढे ‘रा.स्व. संघाच्या समर्थनातील माहिती फेसबूक संकेतस्थळावर टाकल्यास तुला बघून घेतो’, अशीही धमकी दिली आहे.
८. वरील सर्व गोष्टी बारकाईने पडताळल्यास सत्यजित याने श्री. उरसाल यांच्याशी यापूर्वी कधीही आणि कोणत्याही प्रकारे संबंध नसतांना त्याने दिलेल्या धमकीवरून हा पूर्वनियोजित कारस्थानाचा भाग आहे. या कारस्थानात अनेक जण सहभागी असण्याची शक्यता आहे.
९. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी न केल्यास वैध मार्गाने आंदोलन छेडले जाईल, तसेच श्री. उरसाल यांच्यावर आक्रमण होऊन त्यांच्या जीविताचे बरे-वाईट झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व पोलीस प्रशासनावर राहील.
पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी ‘या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले. या वेळी त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुजर यांना तसा आदेशही दिला.
निवेदन देतांना उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहराध्यक्ष श्री. शरद माळी, ‘वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशन’चे श्री. अवधूत भाट्ये, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, सुधाकर सुतार, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मुकुंद माने, केदार जोशी, विवेक मंद्रुपकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर, राजेंद्र सूर्यवंशी, सुदर्शन भोसले, स्वानंद कुलकर्णी, सचिन मागोरे, अमर बराले आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात