जातीव्यवस्था तसेच संप्रदाय यांच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण सत्र
प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या जातीचा, राज्याचा, तसेच प्रादेशिक भाषेचा घटक असतो. राजकारणी याचा आधार घेऊन हिंदूंना विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी यापुढील काळात भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हेच प्राधान्य ठेवून कार्य करण्याचा निर्धार जातीव्यवस्था, तसेच संप्रदायाच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृतीचे रक्षण, या सत्रात करण्यात आला.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आमची संघटना हिंदु जनजागृती समवेत खांद्याला खांदा लावून काम करील ! – राजेंद्रनाथ त्रिपाठी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तरप्रदेश
हिंदुत्वाचा प्राण ब्राह्मण आहे. धर्माचे रक्षण करणार्या ब्राह्मणांवरच आज घाला घातला जात आहे. यामुळे हिंदुत्व धोक्यात आहे. हिंदुत्व धोक्यात असल्याने आज देश धोक्यात आहे. केंद्रात आणि अनेक राज्यात हिंदूंच्या विचारांचे सरकार असूनही नवीन मशीद बांधायला अनुमती लागत नाही; मात्र शेकडो वर्षे प्राचीन मंदिर लगेच तोडले जाते. स्वातंत्र्यानंतर आरक्षणामुळेही देशाची प्रचंड हानी झाली आहे. आमची संघटना वसुधैव कुटुम्बकम् । हे ध्येये घेऊन काम करते. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आमची संघटना हिंदु जनजागृती समवेत खांद्याला खांदा लावून काम करील.
मंदिरांमध्ये पूजेच्या संबंधी निर्णय घेणारे सरकार मशीद आणि चर्च यांमध्ये कधी हस्तक्षेप करते का ? – उदय महा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अकोला, महाराष्ट्र
ब्राह्मण समाज हा हिंदु धर्माचा रक्षक असल्याने ब्राह्मण समाजाला दडपण्याचे षड्यंत्र सरकारच्या वतीने चालवले जात आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात ब्राह्मण पुजार्यांना पूजा करण्याचा अधिकार आहे. गेल्या दीड वर्षांपासून या पुजार्यांचे अधिकार संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र चालू असून सध्या त्यांचे अधिकार संपुष्टात आणण्यात आले आहेत. मंदिरांमध्ये पूजेच्या संबंधी निर्णय घेणारे सरकार मशीदीमधील मौलवी आणि चर्च यांमध्ये कोण मौलवी अथवा पाद्री काम करणार हे कधी ठरवते का ?
ते संप्रदायाच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृतीरक्षण, या विषयावर बोलत होते.
हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रभु श्रीरामांचा आदर्श ठेवून कार्य करावे लागेल ! – श्रवणसिंह गोजावत, हिंदुत्व अभियान, अखिल भारतीय संघटक, देवास, मध्यप्रदेश
जातीवादाच्या नावावर हिंदु धर्मात विष कालवले जात आहे. भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हे हिंदूंना सांगून त्यांना संघटित करावे लागेल. ख्रिस्ती मिशनरी गरीब लोकांमध्ये आर्थिक, तसेच अन्य लाभांचे अमिष दाखवून धर्मांतर करतात. त्यासाठी आम्ही प्रामुख्याने आदिवासी लोकांमध्ये जाऊन कार्य करतो. त्यांना जवळ करून आधार देण्याचे काम करतो. प्रभु श्रीरामचंद्रांनी लोकांमध्ये जाऊन कार्य केले. त्यामुळे हिंदु राष्ट्र बनण्यासाठी प्रभु श्रीरामाचा आदर्श ठेवून कार्य करावे लागेल.
ते हिंदुत्व अभियानाच्या माध्यमातून आदिवासी-भटके विमुक्त समाज यांचे संघटन करतांना आलेले अनुभवकथन, या विषयावर बोलत होते.
भटक्या विमुक्त जमातीतील हिंदू त्यांच्या पायावर उभे रहाण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला ! – अधिवक्ता अक्षय गोसावी, महाराष्ट्र संयोजक, हिंदुत्व अभियान
भटक्या विमुक्त जमातीतील हिंदू त्यांच्या पायावर उभे रहाण्यासाठी विश्वकर्मा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट ही कापड उद्योगातील आस्थापना स्थापन केली. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होऊन ते स्वयंपूर्ण होत आहेत. या प्रकारामुळे ख्रिस्ती मिशनरी जी आर्थिक प्रलोभन दाखवत आहेत, त्याला काही प्रमाणात चाप बसायला साहाय्य होईल.
भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी धर्मनिष्ठ शिक्षण देऊन गुरुकुलांचे संरक्षण करावे लागेल ! – श्री. देवकरण शर्मा, श्री सप्तर्षी गुरुकुल संस्थापक-अध्यक्ष, उज्जैन, मध्यप्रदेश
गेल्या सहस्रो वर्षांत भारतावर झालेल्या आक्रमणात तक्षशीला आणि नालंदा विद्यापिठे संपवण्यात आली. भारतीय संस्कृती मोडून काढण्यासाठी गुरुकुलांना संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. इंग्रजांच्या काळात तर गुरुकुलांना कालबाह्य ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. वैदिक संस्कृतीने घालून दिलेली मानवी मूल्ये आपण सोडल्याने आपले अध:पतन झाले. गुरुकुलांकडे सरकारचेही दुर्लक्ष होत असून समाजाने त्यासाठी काहीतरी योगदान देण्याची आवश्यकता आहे. हिंदु संस्कृती आणि धर्म वाचवण्यासाठी आपल्याला धर्मनिष्ठ शिक्षण द्यावे लागेल. याचा समावेश शिक्षणात करावा लागेल. वैदिक शिक्षण देणार्या गुरुकुलांना संरक्षण देण्याची अत्यावश्यकता आहे, तसेच गुरुकुलांचे संघटन करावे लागेल, असे आवाहन श्री. देवकरण शर्मा यांनी केले. ते उच्च हिंदु केंद्र बनवण्यासाठी गुरुकुलांच्या संघटनांची आवश्यकता या विषयावर बोलत होते.
हिंदु राष्ट्र आल्यानेच सर्व प्रश्न सुटतील ! – श्री. बिघ्नेश्वर दास, जिल्हा अध्यक्ष, भारत स्वाभिमान ट्रस्ट, गजपती, ओडीसा
रामनाथी आश्रमात दैवी शक्तीनुसार कार्य चालू असल्याचे जाणवले. पूर्वी राजकीय सत्तेतून परिस्थिती पालटेल, असे वाटत होते; मात्र आता वाटत आहे की, हिंदु राष्ट्र आल्यानेच सर्व प्रश्न सुटतील.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्चितच साध्य होईल ! – कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन, नवी देहली
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्चितच साध्य होईल, याची शाश्वती वाटते. वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील त्रिवेणी संगमात स्नान केल्याने शक्ती मिळते. मानवातील षड्रिपू जाळून टाकण्याचे स्थळ म्हणजे वाराणसी. मनुष्य जीवन जगतांना प्रत्येकाने फुल बनून सुगंध पसरवायला हवा. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीरुपी माळेमध्ये एक फुल बनायला हवे. इथून जातांना प्रत्येकाने हिंदु राष्ट्रासाठी काहीतरी कार्य करण्याची प्रेरणा घेऊन जा, असे आवाहन कर्नल अशोक किणी यांनी केले.
0 Comments