Menu Close

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे सरकारला निवेदन

‘पॉर्न साईट्स’ आणि अश्‍लीलता अन् हिंसक दृश्ये यांचा भडीमार असलेल्या ‘वेब सिरीज’ यांवर त्वरित बंदी घाला ! : हिंदु जनजागृती समितीची मागणी

यवतमाळ : लहान मुले आणि युवक यांना भ्रमणभाषमध्ये  सहज उपलब्ध होणार्‍या विविध ‘पॉर्न साईट्स’ आणि अश्‍लीलता अन् हिंसक दृश्ये यांचा भडीमार असलेल्या ‘वेब सिरीज’ यांवर बंदी घालावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य इंटरनेट उपलब्ध केल्यामुळे होणारे दुष्परिणाम थांबवावेत, या मागण्यांचे निवेदन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, नवी देहली यांना हिंदु जनजागृती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने २९ मार्चला पाठवण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर कुंभलकर यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी कुंभलकर यांनी या गंभीर समस्येविषयी चिंता व्यक्त केली ते म्हणाले, ‘‘या समस्येमुळे सध्याचे आई-वडील हतबल झाले आहेत, आम्ही आपल्या भावना शासनापर्यंत कळवू.’’

या वेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद ठोसर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनासमवेत दुधात भेसळ करून मानवी जीवनाशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठीचा पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *