मंदिराच्या भूमीवर अवैध नियंत्रण मिळवण्यास केला होता विरोध
|
करौली (राजस्थान) – येथील सपोटरा तालुक्यातील राधा गोविंद मंदिराचे ५० वर्षीय पुजारी बाबूलाल वैष्णव यांना भू माफिया आणि त्याच्या ५ साथीदारांनी ८ ऑक्टोबर या दिवशी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली. त्यांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आल्यानंतर ९ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. पुजारी बाबूलाल यांनी या भू माफियांना मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करण्यापासून रोखले होते. त्यामुळे त्यांना ठार करण्यात आले. पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. कैलाश मीणा या प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Rajasthan horror shocks India: Priest allegedly set on fire, died fighting mandir land grab. @INCIndia sarkar apparently hints at suicide, @BJP4India rakes up ‘Palghar pattern’.
Watch Rahul Shivshankar on India Upfront. | #PalgharRerunUnderCong pic.twitter.com/kHlEuQcxR1
— TIMES NOW (@TimesNow) October 9, 2020
१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे भीम आर्मी या संघटनेकडून मागासवर्गियांना भडकावण्यात येत आहे, तसचे हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवण्यास आणि त्याचा अवमान करण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे.
२. पुजारी बाबूलाल यांना मंदिराच्या नावावर भूमी दान देण्यात आली होती. येथे त्यांनी त्यांचे घरही बनवले होते. या भूमीवर भू माफिया अतिक्रमण करू इच्छित होते. स्थानिक मागासवर्गीय समुदायचे लोक या मंदिरावर नियंत्रण मिळवू इच्छित होते आणि त्यांना पुजारी बाबूलाल विरोध करत होते, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात