Menu Close

ओमळी येथे १५ दिवसांच्या शौर्य जागृती वर्गाचा समारोप

शौर्य जागृती वर्ग

सावर्डे (महाराष्ट्र) – चिपळूण तालुक्यातील ओमळी येथे १५ दिवसांच्या शौर्य जागृती वर्गाच्या समारोपीय वर्गात सहभागी धर्मप्रेमींना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आली. हनुमान जयंतीला झालेल्या गदापूजन उपक्रमात शौर्य जागृती वर्गाची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ५ मेपासून सलग १५ दिवसांचा शौर्य जागृती वर्ग घेण्यात आला.२३ मे या दिवशी या वर्गाचा समारोप करण्यात आला. या वर्गाला १८ धर्मप्रेमी उपस्थित होते. या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये कराटेचे प्रकार, स्वसंरक्षणाचे तंत्र, दंडसाखळी आणि लाठीचे प्रकार शिकवण्यात आले.

या कार्यक्रमाला श्री. विनायक कांगणे, पूर्वीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते श्री. अनंत पवार, श्री. विक्रम साळुंखे त्याचसमवेत गावातील श्री. यशवंत सावंत आणि श्री. शिवराम साळुंखे हे उपस्थित होते.

मनोगत

१. कु. प्राची सावंत – वर्गातून नमस्काराचे महत्त्व, कुंकू लावण्याचे महत्त्व समजले.

२. कु. सानिया पवार – वर्गात आतापर्यंत जे शिकलो, ते सातत्याने करत रहाणार.

३. श्री. विक्रम साळुंखे – आताच्या काळात महिलांनी सशक्त होणे आवश्यक आहे.

४. श्री. अनंत पवार – हिंदु जनजागृती समितीच्या मागे ईश्वरी शक्ती उभी आहे. आता बोलण्यापेक्षा कृती करणे महत्त्वाचे आहे.

Related News