Menu Close

श्रीराम सेनेकडून कर्नाटक राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये हिंदु युवतींसाठी ‘हेल्पलाइन’

मंगळुरू (कर्नाटक) – लव जिहाद प्रकरणात हिंदु युवती आणि महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने ‘हेल्पलाइन’ (साहाय्य दूरभाष संपर्क यंत्रणा) योजना चालू करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी या ‘हेल्पलाइन’ योजनेचे उद्घाटन करण्यात आले. ‘हेल्पलाइन’ क्रमांक ९०९०४४३४४४ हा असून या साहाय्य दूरभाष पथकात माजी पोलीस अधिकारी आणि अधिवक्ते यांचा समावेश असेल. हुब्बळ्ळी येथील क्युबिक्स हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी साहाय्य दूरभाष योजनेला प्रारंभ केला.

याप्रसंगी बोलताना मंगळुरूचे श्रीराम सेना राज्य प्रधान कार्यदर्शी आनंद शेट्टी अड्यार म्हणाले की, लव जिहादला बळी पडलेल्या युवती, त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक यांनी या साहाय्य दूरभाषवर संपर्क साधताच श्रीराम सेनेचे पथक कायद्याच्या चौकटीत राहून योग्य कारवाई करेल.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News