Menu Close

गाझियाबाद येथे यासीन कुरेशी याच्या पशूवधगृहावर धाड टाकून काम करणार्‍या ५७ अल्पवयीन मुलांची सुटका

अल्पवयीन मुलांना कामाला लावणार्‍यांना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा केली पाहिजे ! – संपादक 

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मसुरी भागातील यासीन कुरेशी याच्या ‘इंटरनॅशनल ग्रो फूड’ या पशूवधगृहात काम करणार्‍या ५७ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या साहाय्याने या मुलांची सुटका करण्यात आली. यामध्ये ३१ अल्पवयीन मुली आणि २६ अल्पवयीन मुले यांचा समावेश आहे. या मुलांना बिहार आणि बंगाल येथून आणण्यात आले होते आणि त्यांना काम करायला लावले जात होते.

या मुलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यांना ‘गाझियाबादमध्ये नोकरी लावण्यात येईल’, असे सांगण्यात आले होते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी या कारवाईची ‘एक्स’वर माहिती दिली.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News