राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
झुंझुनू (राजस्थान) – झुंझुनू जिल्ह्यातील राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंचे मृतदेह सापडले आहेत. या दोघांचे वय ४० ते ४५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे. या दोन्ही साधूंची ओळख अद्याप पटलेली नाही.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात