Menu Close

हरिद्वारमधील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवले !

आता सरकारने ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईही करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक 

हरिद्वार (उत्तराखंड) – ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी येथील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) हटवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र सिंह डोवाल यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ध्वनीप्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे कार्यवाही (अंमलबजावणी) करण्याविषयीच्या सूचना सर्व धार्मिकस्थळांना देण्यात आल्या आहेत. कुठेही नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास ध्वनीक्षेपक काढून टाकण्यात येतील आणि दंडही आकारला जाईल, अशी चेतावणी हरिद्वार पोलिसांनी दिली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्ष २०२२ मध्ये मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर कारवाई केली होती.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News