Menu Close

लाहोर (पाकिस्तान) येथे पुढील वर्षी होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना

पाकपुरस्कृत आतंकवादी काश्मीरमध्ये घुसून हिंदूंना ठार मारत असतांना पाकसमवेत कुठेच क्रिकेटचा सामना खेळू नये, अशी भूमिका आता सरकारने घेण्याची आवश्यकता आहे ! – संपादक 

नवी देहली – अमेरिकेत आयोजित ‘टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धे’त भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना ९ जून या दिवशी झाला. यात भारताने पाकचा पराभव केला. आता पुढील ८ मासांनंतर, म्हणजे १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत पाकिस्तानच्या लाहोर येथे ‘चॅम्पियन चषक’ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेचा सामना होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय संघाने खेळण्यास जाण्याविषयी भारत सरकारला निर्णय घ्यायचा आहे. अनुमती न मिळाल्यास आशिया चषकाप्रमाणेच पाकिस्तानला वेगळे नियोजन करावे लागणार आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News