-
हिंदु जनजागृती समितीची पुणे येथे आंदोलनाद्वारे मागणी
-
‘महाराज’ या नेटफ्लिक्स चित्रपटात संतांना गुंड दाखवून अपमान करण्यात आल्याचे प्रकरण
- हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येते, हे संतापजनक !
- हिंदु संतांचा अपमान करणारे चित्रपट बनवणारे हिंदुद्वेष्टे मदरशांंमध्ये मौलवींद्वारे होणारे मुला-मुलींचे लैंगिक शोषण किंवा चर्च वा चर्चप्रणीत वसतीगृहांमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंकडून होणारे तरुणी आणि महिला यांचे शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का ?
- हिंदू अतीसहिष्णु असल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असेच चित्रपट काढले जात आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करणे आवश्यक ! – संपादक
पुणे (महाराष्ट्र) : भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवून समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. असे असतांना अभिनेते आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान याची प्रमुख भूमिका असलेला, तसेच ‘यशराज फिल्म्स’ची निर्मिती असलेला ‘महाराज’ या ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी (या अॅप्सवरून चित्रपट अथवा अन्य कार्यक्रम पहाण्याची सुविधा असते) मंचावर प्रसारित होणार्या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकीर्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ जून या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
https://www.facebook.com/jagohindupune?ref=embed_post
या वेळी ७० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट १४ जून या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Place immediate ban on ‘Maharaj’ film releasing on Netflix@HinduJagrutiOrg demands through an agitation in Pune
Case of gross insult of Hindu saints by portraying them as thugs through the film ‘Maharaj’ scheduled to release on Netflix
👉 Will those Hindu haters who make… pic.twitter.com/q5pdpSj3Nu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2024
या चित्रपटात साधू-संत हे दुराचारी आणि वासनांध असतात, असे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून कायदा अन् सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सर्वस्वी जुनैद खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे उत्तरदायी असतील.
Agitation in Pune by Hindu Janajagruti Samiti !
Ban Maharaj Film for defaming Hindu saints and sects. – @Ramesh_hjs
Even earlier, Aamir Khan’s film ‘PK’ had shown derogatory scenes and offensive dialogues about Lord Shiva, depicting Hindu saints as gangsters. Now, his son is… pic.twitter.com/JLL56jaivH
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 12, 2024
त्यामुळे सरकारने या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, तसेच देवता, धर्म, संत आदींचा अवमान रोखण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ देशभरात लागू करावा, अशी मागणीही या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली.
#Netflix पर #AamirKhan के बेटे के अभिनय वाली फ़िल्म #Maharaj आने वाली है।
जिसमें भगवान श्री कृष्ण का पेंडेंट पहनकर अश्लील सीन दिखाए जाने वाले हैं।
राजकोट में हुए सनातन धर्म सम्मेलन में जगतगुरु शंकराचार्य द्वारिका पीठाधीश्वर श्री सदानंद सरस्वती जी महाराज ने महाराज फिल्म का… pic.twitter.com/1irTYKo1mU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2024
Following protests by devout Hindus and SM users like @GemsOfBollywood Bollywood has been wary of relasing anti Hindu movies in theaters! – @RealRajanjha
But now it has stooped to it’s agenda of denigrating Hindu deities and saints on OTT#BoycottNetflix
Ban Maharaj Film pic.twitter.com/cERpUHHwVt— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2024
https://www.facebook.com/watch/jagohindupune/?ref=embed_video
काय आहे प्रकरण ?
‘महाराज’ या चित्रपटातून १५० वर्षांपूर्वी इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून आज पुन्हा साधू-संत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचे चित्रण उभे केले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची अपकीर्ती करण्याचे षड्यंंत्र केले जात आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधून एका हिंदु धार्मिक नेत्याची व्यक्तिरेखा नकारात्मक स्वरूपात दाखवली जात आहे.