-
चित्रपटात हिंदूंच्या संतांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप
-
या संदर्भातील हॅशटॅग ट्रेंड दुसर्या क्रमांकावर !
(हॅशटॅग ट्रेंड म्हणजे एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे)
मुंबई – अभिनेते आमिर खान यांचा मुलगा जुनैद खान याचा ‘महाराज’ हा पहिला चित्रपट १४ जून या दिवशी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी (ओटीटीद्वारे दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात) मंचावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कथा १६२ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाची आहे, ज्यात वैष्णव पंथाच्या अंतर्गत असलेल्या वल्लभ संप्रदायाच्या साधूंवर महिला भक्तांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हिंदुद्वेषी धोरण राबवण्यासाठी या घटनेचा आधार घेऊन बॉलिवूडचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा समोर आला आहे. याविषयी ‘एक्स’वरून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे. हिंदूंनी सकाळपासूनच हा ट्रेंड चालू केला होता. तसेच, हिंदु धर्म आणि देवतांचा अनादर करणार्या अनेक वेब-सीरीज आणि चित्रपट नेटफ्लिक्सवर दाखवले जातात, त्यामुळे वापरकर्त्यांनी ‘#BoycottNetflix’ हा हॅशटॅग ट्रेंड केला आणि ‘नेटफ्लिक्सवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. हा ट्रेंड दुसर्या क्रमांकावर होता, तर ‘बॅन महाराज फिल्म’ या चित्रपटावर बंदीची मागणी करणारा ‘कीवर्ड’ ट्रेंड सहाव्या क्रमांकावर होता.
Aamir Khan's son, Junaid Khan, is perpetuating this narrative in the movie Maharaj. By referencing an incident from British rule 150 years ago, the film creates a false image of Sadhus and the Vallabh Sampradaya. This film appears to be part of a nationwide conspiracy to defame… pic.twitter.com/XnBsAhVStB
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) June 13, 2024
या ट्रेंडवर एकाने लिहिले की, आधी आमिर खान याने हिंदूंच्या धार्मिक परंपरांचा अपप्रचार केला आणि आता त्याने तीच मशाल त्याच्या मुलाला दिली आहे; पण मदरसा आणि मशिदी यांत मौलवी करत असलेल्या गैरकृत्यांविषयी ते काहीच बोलत नाहीत.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात