वाराणसी (उत्तरप्रदेश) : अखिल भारतीय सनातन न्यासाच्या वतीने जैतपुरा येथील मां बागेश्वरीच्या प्रांगणामध्ये ९ दिवसांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, काशीविश्वनाथ मंदिर प्रभागाचे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडेय आणि अन्य संतवृंदांच्या वतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आला. कथावाचक पातालपुरी पीठाधीश्वर महंत बालक दास महाराज यांनी कथावाचन केले.
या वेळी सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘आपल्या धर्माने आपल्याला अनेक तपस्वी संत, महाराजा, राष्ट्रपुरुष आणि कितीतरी तपस्वी महिला विरांगना दिल्या आहेत. अशी आपली समृद्ध सांस्कृतिक विरासत आहे. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, तसेच त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.’’ याप्रसंगी प्रा. नागेंद्र पांडेय म्हणाले, ‘‘सर्व हिंदूंनी एक हिंदु म्हणून आपल्या कर्तव्याचे भान ठेवले पाहिजे.’’