Menu Close

जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या उद़्‌घोषात वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला प्रारंभ !


रामनाथी (गोवा) : ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’चा उत्‍साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत २४ जून या दिवशी रामनाथी, फोंडा येथील श्री रामनाथ देवस्‍थानच्‍या विद्याधिराज सभागृहात हिंदु जनजागृती समिती आयोजित वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.

असा झाला उद़्‍घाटन सोहळा !

धर्मसंस्‍थापनेची देवता भगवान श्रीकृष्‍णाच्‍या चरणी वंदन करून आणि श्री गणेशाला प्रार्थना करून अधिवेशनाला प्रारंभ झाला. यानंतर महामंडलेश्‍वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, स्‍वामी निर्गुणानंद पुरी, महामंडलेश्‍वर आचार्य स्‍वामी प्रणवानंद सरस्‍वती, श्रीवासदास वनचारी, संत रामज्ञानीदास महात्‍यागी महाराज, रस आचार्य डॉ. धर्मयश, प.पू. संत संतोष देवजी महाराज, संतवीर ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. महोत्सवाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दीपप्रज्वलन नंतर वेदमंत्रांचे पठण झाले. या वर्षी हिंदु धर्मासाठी कार्य करतांना मृत्यू पावलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हिंदू-धर्मप्रेमींना सद्गती मिळावी यांसाठी सनातन संस्थेचे पुरोहित साधक श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. अमर जोशी यांनी मंत्रपठण केले ! अधिवेशनाच्या निमित्ताने ट्वीटरवर VHRMGoa_Begins या हॅशटॅगद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा देशभर चालू असल्याचे दिसून आले. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

ग्रंथांचे प्रकाशन !

या प्रसंगी ‘रुग्णाची सेवाशुश्रूषा साधना म्हणून कशी करावी ?’ आणि ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध’ या दोन मराठी, ‘पुण्य-पाप यांचे प्रकार आणि परिणाम’ आणि ‘पापाचे दुष्परिणाम घालवण्यासाठी प्रायश्चित्ते’ या दोन तेलगु, तर ‘गुरूंचे महत्त्व’ या तामिळ भाषेतील एका ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

संत सन्मान

संत संदेश

Related News