स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नीतींचे पालन केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई
‘संख्याबळात शक्ती आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते. त्यांचे हे वाक्य हिंदूंनी ऐकले नाही; पण मुसलमानांनी मनावर घेतले. त्यामुळे ते त्यांची लोकसंख्या वाढवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. याउलट हिंदू १ किंवा २ मुलांवरच समाधानी आहेत. त्यामुळे हिंदु लोकसंख्येचे प्रमाण न्यून होऊन मुसलमानांची संख्या वाढत आहे. एवढेच नाही, तर भारतात प्रतिदिन सहस्रो बांगलादेशी घुसखोरी करत आहेत. त्यामुळे देशात अनेक लहान लहान पाकिस्तान निर्माण होत आहेत. अशा स्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेल्या नीतींचे पालन केले पाहिजे, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल आणि आपला देश वाचणार आहे.
इंग्रजांनी ‘भारतात रहाणारे वैदिक सनातनी हेच खरे हिंदु असून अन्य हिंदु नाहीत’, असे घोषित केले. त्यामुळे हिंदू विभागले गेले होते. अशा वेळी सर्व हिंदूंना एका सूत्रात बांधण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘या भारतात रहाणारे सर्व हिंदु आहेत’, अशी हिंदु शब्दाची व्याख्या केली. सध्या राजकीय लाभासाठी काही राजकारण्यांकडून हिंदूंना जातीपातीत विभागले जात आहेत. सावरकर म्हणाले होते की, ‘माझी मार्सेलिसची उडी विसरलात, तरी चालेल; पण माझे संघटनाचे कार्य विसरू नका.’ आज आपण हे दोन्हीही विसरून गेलो आहोत. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्यानुसार संघटित झालो, तर हिंदु राष्ट्र होऊ शकते.
घराघरांत वेद, उपनिषद आणि गीता यांचा अभ्यास केला गेला पाहिजे ! – महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख
हिंदु धर्मावर ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ यांच्या माध्यमातून आक्रमण होत आहे. मुसलमानांनी आपल्यावर आक्रमण करून सहस्रावधी वर्षे राज्य केले. हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्ती आक्रमणकर्त्यांनीही हिंदु धर्मावर आक्रमण केले आणि आजही करत आहे. भारतातील गरीब आदिवासी लोकांना लक्ष्य करून त्यांचे धर्मांतर केले. आज ते आदिवासी समुदायातील लहान मुलांना लक्ष्य करून त्यांचे धर्मांतर करत आहेत. एकप्रकारे वैचारिक आतंकवाद पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावर मात करण्यासाठी हिंदूंनी घराघरांत वेद, उपनिषद आणि गीता यांचा अभ्यास केला गेला पाहिजे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंदु धर्मावरच आक्रमण करत आहे. हिंदु संतांनाच ते लक्ष्य करत आहेत. हिंदु समाज जातींमध्ये विभागला आहे. आपण सर्वांनी हिंदु म्हणून एकत्र आले पाहिजे. आज हिंदु युवकांना जागृत करून त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे.
हिंदू जागृत न झाल्यास त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल ! – पू. संत भागीरथी महाराज, अध्यक्ष आणि संचालक, गुरुकृपा सेवा आश्रम, बेलतरोडी, नागपूर, महाराष्ट्र
आज सामान्य हिंदूंनी जागृत होण्याची वेळ आहे. त्यांनी कोणत्याही हिंदूंचा कार्यक्रम, संघटना यांच्यात सहभागी होऊन एकत्र आले पाहिजे. ते जागृत झाले नाही, तर त्यांना आश्रयालाही स्थान मिळणार नाही आणि पश्चाताप करण्याची पाळी येईल.
आज हिंदूंवर धर्मांधांचे मोठ्या प्रमाणात आघात होत आहेत. अनेक लहान लहान व्यवसाय मुसलमानांनी कह्यात घेतले आहेत. त्यामुळे हिंदूंनी अशा व्यावसायिकांवर आर्थिक बहिष्कार घालणे आवश्यक आहे. ही कर्मवीर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. येथे ‘हलाल’ आणि ‘दलाल’ चालणार नाहीत, असा संकल्प हिंदूंनी घेतला पाहिजे. आज देशात विविध मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत. त्या सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे.
पुढील अधिवेशनापर्यंत १ सहस्र गावांमध्ये हनुमानचालीसा पठण चालू करू ! – कमलेश कटारीया,अध्यक्ष, संकल्प हिंदु राष्ट्र अभियान, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
बजरंगबली हनुमान धर्मसंस्थापनेला बळ देणारी देवता आहे. रावणवधासाठी मारुतिरायाने प्रभु श्रीरामांना साहाय्य केले. महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावर सूक्ष्मरूपात विराजमान होऊन कौरवांचा नाश करण्यासाठी मारुतिरायांनी अर्जुनाला बळ दिले. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी बजरंगबली हनुमान बळ प्रदान करतील. यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक शनिवारी हिंदु युवकांनी हनुमान मंदिरामध्ये एकत्र येऊन हनुमानचालीसा पठण करावे आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा संकल्प करावा. संकल्प हिंदु राष्ट्र अभियानाद्वारे आतापर्यंत ११७ शनिवारी १७८ गावांमध्ये ८ सहस्रांहून अधिक युवक हनुमान मंदिरामध्ये एकत्र येऊन हनुमानचालीसापठण करत आहेत. पुढील हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये १ सहस्र गावांमध्ये आम्ही हनुमानचालीसापठण चालू करण्याचा प्रयत्न करू.