Menu Close

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : देशाची सुरक्षा आणि धर्मरक्षा

डावीकडून प्रज्वल गुप्ता (अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती), सतीश कुमार (राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब), टी.बी. शेखर (राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्), नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली
डावीकडून पू. रमानंद गौडा (धर्मप्रचारक संत, सनातन संस्था, कर्नाटक) टी.बी. शेखर (राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्) यांचा सन्मान करताना

केरळमधील काँग्रेस आणि साम्यवादी सरकारला शबरीमला यात्रा होऊ द्यायची नाही ! –  टी.बी. शेखर, राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्

टी.बी. शेखर, राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्
टी.बी. शेखर, राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्

रामनाथी : ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ची स्थापना वर्ष २००८ मध्ये मिझोरामचे माजी राज्यपाल कुमारम् राजशेखरची यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. ‘सर्व्ह अय्यप्पा सेव्ह शबरीमला’ (अयप्पा स्वामींची सेवा करा, शबरीमलाचे रक्षण करा) या उद्देशाने ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ची स्थापना करण्यात आली. शबरीमलामध्ये येणार्‍या भक्तांना भगवान अय्यप्पांचे सुरक्षित आणि कुठल्याही अडचणीविना व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी ही संस्था कार्यरत आहे; कारण येथे येणार्‍या यात्रेकरून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केरळमधील आतापर्यंत असलेली काँग्रेस किंवा साम्यवादी सरकारे सरकारे हिंदुविरोधी आहेत.त्यांना हिंदु यात्रेकरूंची यात्रा अडचणीविना पार पडलेली नको आहे. ते यात्रेकरूंना अनेक प्रकारचे अडथळे आणतात, असे शबरीमला अयप्पा सेवा समाजम्चे राष्ट्रीय अध्यक्ष  टी.बी. शेखर यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सांगितले. वर्ष २०१७ पासून श्री. टी.बी. शेखर हे ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

श्री. शेखर पुढे म्हणाले की, केरळ सरकार अन्नदानाला विरोध करते. भगवान अय्यप्पा ‘अन्नदान प्रभु’ म्हणून प्रसिद्ध आहेत. अन्नदान करण्यासाठीही ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ला न्यायालयात जाऊन अनुमती मिळवावी लागली. शबरीमला रथयात्रा ४८ दिवस चालते. यात्रेच्या काळात प्रतिदिन ८० सहस्र यात्रेकरू शबरीमलाला भेट देतात. या यात्रेकरूंसाठी ‘शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम्’ने केरळमध्ये १४० अन्नदान केंद्रे चालू केली आहेत. प्रत्येक ५० किलोमीटरवर एक अन्नदान केंद्र चालू करण्यात आले आहे. ख्रिस्त्यांनी शबरीमला परिसरात एक चर्च बांधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला हिंदूंनी विरोध केल्यानंतर ते काम बंद पडले. आरंबोल येथे विमानतळ उभारण्यासाठी तेथील ध्वजस्तंभ काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.

शबरीमला मंदिरातील भगवान अय्यपा हे ‘चिन्मय’ मुद्रेमध्ये आहेत. त्यामुळे मंदिराच्या परंपरेनुसार या मंदिरात १० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील वय असलेलल्या महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. वर्ष २०१९ मध्ये सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाच्या विरोधात ६० सहस्र महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मंदिरातील परंपरा तोडण्यास विरोध केला. त्यामुळे मंदिरातील प्रथा चालू राहिली. व्हॅटिकन आणि मक्का यांच्यानंतर सर्वाधिक यात्रेकरू शबरीमला येथे भेट देतात. सरकारला येथील यात्रेकरूंची संख्या कमी करायची आहे. त्यामुळे ते सर्व अडथळे निर्माण करतात.

गोरक्षणाचे कार्य करतांना भगवंताने आमचे रक्षण केले ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब

सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब
सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब

गाय वाचली, तर जग वाचेल. सरकार त्याचे कार्य करणार आहे. आपल्याला राष्ट्र, धर्म आणि गोरक्षण यांचे कार्य करायचे असेल, तर लढावे लागणार आहे. धर्म आणि अधर्म यांचे युद्ध निश्चितपणे होणार आहे.एक दिवस हिंदूंना आरपारची लढाई करावी लागणार आहे. त्यासाठी हिंदूंना आतापासून सिद्धता करावी लागणार आहे. अद्यापही भारतात गोहत्या आणि पशूवधगृहे बंद झालेली नाहीत. गोरक्षकांच्या त्रासात कोणतीही न्यूनता आली नाही. आजही गोरक्षकांनाच अटक केली जाते. गोरक्षणाचे कार्य करतांना आमच्यावर अनेक आक्रमणे झाली; पण त्याच्यातूनही भगवंताने आमचे रक्षण केले. देव, धर्म, राष्ट्र आणि गोमाता यांचे रक्षण केले, तर आपल्याला आनंद मिळणार आहे. सरकारने गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करून गोहत्या बंद करावी, अशी आमची मागणी आहे, असे प्रतिपादन गोरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश कुमार यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिवशी म्हणजे २६ जून या दिवशी केले.

सतीश कुमार यांनी कारागृहात राहून केलेली साधना
गोरक्षणाच्या कार्यामुळे मी स्वत: ३ वर्षे कारागृहात होतो. तेथे मी भगवंताचे नामस्मरण केले, तसेच ५ ग्रंथांचे लिखाण केले. ज्या दिवशी मला कारागृहात टाकले, त्या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टमी होती. मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे. तो त्रास शरिराशी संबंधित आहेत, मनाशी नाहीत. त्यामुळे धर्माचे कार्य करायचे असेल, तर भीती सोडून दिली पाहिजे.

गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोव्याच्या भूमीत होत असलेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून हिंदु राष्ट्राची मागणी चालू झाली होती. आता हिंदु राष्ट्राची मागणी देशभरातून उठत आहे ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल

ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली

नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली
नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली

अनेक शतकांपासून भारतावर इस्लामी आक्रमण चालू आहे. त्या-त्या कालावधीत आक्रमकांनी आक्रमणाची पद्धत पालटली आहे. अमेरिकेने अर्थव्यवस्थेच्या बळावर जगावर राज्य केले. जगावर राज्य करण्यासाठी अर्थव्यवस्था बळकट करायला हवे, हे लक्षात आल्यावर प्रथम ‘इस्लामिक बँकींग’ चालू झाले. भारतात काँग्रेसचे सरकार असतांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतात ‘इस्लामिक बँकींग’ला अनुमती दिली होती; मात्र त्यांचे सरकार गेल्यामुळे यावर कार्यवाही झाली नाही. त्यानंतर हलाल प्रमाणपत्र चालू केले. वर्ष २०१७ मध्ये हलाल प्रमाणपत्राची अर्थव्यवस्था २.१ यु.एस्. ट्रिलियन डॉलर (१ सहस्र ७५४ लाख कोटी रुपयांहून अधिक) होती. वर्ष २०२८ पर्यंत हलाल प्रमाणपत्रांची अर्थव्यवस्था ४ यु.एस्. ट्रिलियन डॉलरपर्यंत (३ सहस्र ४०० लाख कोटी रुपयांहून अधिक) वाढण्याची शक्यता आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांमध्ये हलाल प्रमाणपत्राला विरोध होत आहे. उत्तरप्रदेशमध्ये नोव्हेंबर २०२३ मध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालण्यात आली आहे. बंदीनंतर केलेल्या कारवाईत उत्तरप्रदेशमध्ये ३ सहस्र किलो इतकी हलाल उत्पादने कह्यात घेण्यात आली. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचा प्रसाद दिला जातो. त्यामुळे तीर्थक्षेत्रांच्या  ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी युवकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बलशाली झाले पाहिजे ! – प्रज्वल गुप्ता, अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती

प्रज्वल गुप्ता, अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती
प्रज्वल गुप्ता, अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती

हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असेल, तर युवकांना हिंदु राष्ट्रासाठी प्रेरणा द्यावी लागेल, तसेच त्यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बलशाली झाले पाहिजे. धर्मामुळेच समाजाचे रक्षण होणार आहे. त्यामुळे हिंदूंना धार्मिक कार्यक्रमांतून जागृत करावे लागेल, असे प्रतिपादन श्री. प्रज्वल गुप्ता यांनी केले.

श्री. प्रज्वल गुप्ता यांनी युवकांचे संघटन करण्यासाठी काकोरी (जि. लक्ष्मणपुरी) येथे हिंदु जनसेवा समितीची स्थापना केली. ते पुढे म्हणाले, ‘‘लक्ष्मणपुरीच्या आजूबाजूच्या परिसरात वर्ष २०१२ ते २०१५ या कालावधीत ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत होते. त्यासाठी आम्ही वर्ष २०१६ मध्ये १ सहस्र २०० धर्मांतरित घरांमध्ये कलशांची स्थापना केली. त्यांना यज्ञात आहुती देण्याचे आवाहन केले. त्यानंतर ५-५ युवकांना एकेका मंदिराचे दायित्व दिले. अशा प्रकारे १०० मंदिरांशी ५०० युवकांना जोडून दिले आहे. या मंदिरांत आठवड्यातून एकदा स्वच्छता केली जाते, तसेच हनुमानचालिसा म्हटली जात आणि, नामसंकीर्तन केले जाते.’’

Related News