Menu Close

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : ग्रामीण क्षेत्रांमध्ये धर्माविषयी जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न

डावीकडून पू. डॉ. शिवनारायण सेन (सहसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता) भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र), बाल सुब्रह्मण्यम्सं (चालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू), डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा  ट्रस्ट, तेलंगाणा
भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा सन्मान करताना चेतन राजहंस (राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था)
पू. डॉ. शिवनारायण सेन (सहसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता) यांचा सन्मान करताना श्री. विश्वनाथ कुलकर्णी (राज्य समन्वयक, हिन्दू जनजागृति समिति, पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार)
श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी (बालेहोन्नरू, खासा शाखा मठ, श्रीक्षेत्र सिद्धरामबेट्टा, तुमकुरू, कर्नाटक) यांचा सन्मान करताना श्री. चंद्र मोगेर (समन्वयक, हिन्दू जनजागृति समिति, दक्षिण कन्नड, कर्नाटक.)
श्री खराद वीरबसव महास्वामीजी यांचा सन्मान करताना शरथ कुमार नाईक (समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, उत्तरा कन्नड, कर्नाटक)
श्री हनुमंतनाभ महास्वामीजी यांचा सन्मान करताना शरथ कुमार नाईक (समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, उत्तरा कन्नड, कर्नाटक)

हिंदु धर्माचरणामागे आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचार ! – श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी, बालेहोन्नरू, खासा शाखा मठ, श्रीक्षेत्र सिद्धरामबेट्टा, तुमकुरू, कर्नाटक

श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी, बालेहोन्नरू, खासा शाखा मठ, श्रीक्षेत्र सिद्धरामबेट्टा, तुमकुरू, कर्नाटक
श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी, बालेहोन्नरू, खासा शाखा मठ, श्रीक्षेत्र सिद्धरामबेट्टा, तुमकुरू, कर्नाटक

सनातन धर्मानेच शांती मिळते, यावर विदेशातील लोकांचाही विश्वास आहे. या सनातन हिंदु धर्माचा नाश करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. हे थांबवण्यासाठी सर्व संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु धर्मप्रेमी यांना प्रयत्न करावे लागतील. तरच आपला धर्म टिकणार आहे. हिंदु धर्माचरणामागे  आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचारही आहे. अन्य धर्मीय त्यांच्या धर्माविषयी प्रश्न विचारत नाहीत; पण हिंदु धर्माचरण करण्यापूर्वी प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला हिंदूंना धर्माचरणामागील वैज्ञानिक कारणे सांगणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सर्वांना यश प्राप्त व्हावे, असे आशीर्वचन तुमकुरू (कर्नाटक) येथील वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी महाराज यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त दिले.

हिंदु धर्मविरोधकांकडून केल्या जाणार्‍या खोटा प्रचाराविरूद्ध आक्रमक पवित्रा आवश्यक ! – डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा  ट्रस्ट, तेलंगाणा

डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा  ट्रस्ट, तेलंगाणा
डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा  ट्रस्ट, तेलंगाणा

संपूर्ण विश्वामध्ये सनातन धर्मच सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहे. ख्रिस्ती, इस्लामी आणि नास्तिक म्हणजे साम्यवादी यांच्याकडून खोटा प्रचार केला जात आहे. खोटी कथानके रचली जात आहे. याला सामोरे जातांना सनातनधर्मीय बचावात्मक पवित्रा घेत आहेत; मात्र आता वेळ आली आहे की, या खोट्या प्रचाराला सामोरे जातांना आक्रमक आपण पवित्रा घेणे आवश्यक आहे, असे मत तेलंगाणा येथील धर्ममार्गम् सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. भास्कर राजु वी. यांनी येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात व्यक्त केले.

डॉ. भास्कर राजु वी. पुढे म्हणाले की, ख्रिस्ती आणि इस्लामी हे पाखंडी आहेत, तर साम्यवादी हे देशद्रोही आहेत. या लोकांची विचारसरणी अमान्य केली पाहिजे. त्यांची खोटी कथानके फेटाळणारे ‘नॅरेटिव्ह’ आपण सिद्ध केले पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारचे भेद बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटितपणे आपण हे आक्रमक धोरण राबवले पाहिजे. ते करतांना पाखंडी, जिहादी, धर्मांध, ‘कन्व्हर्जन माफिया’, ‘अर्बन नक्सल’ (शहरी नक्षलवाद) इत्यादी शब्दांचा सर्रास वापर केला पाहिजे.

कायदे सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला ! – भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र
भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र

विश्व अनादी आहे आणि या विश्वाचा नियंता ईश्वर आहे. या विश्वाचा कारभार वेदांनुसार चालतो. अन्याय करणार्‍याला नरकयातना भोगाव्या लागतात, तर योग्य वर्तन करणार्‍याला चांगले फळ प्राप्त होते, अशी विश्वाची व्यवस्था आहे. जे भगवंताला मानत नाहीत, त्यांचा यावर विश्वास नाही. धर्म समजण्यासाठी भगवंताने वेदांची निर्मिती केली. सोने जुने झाले; म्हणून त्याचे मूल्य न्यून होत नाही. त्याप्रमाणे वेद पुरातन असले, तरी त्यातील ज्ञान कालबाह्य होत नाही. भगवंताकडे अगाध ज्ञान आहे. सत्ययुगातही आगीत लाकूड टाकल्यास ते जळत होते आणि कलियुगातही जळते. त्याप्रमाणे वेदांमधील ज्ञान शाश्वत आहे. हे सांगणारा मनु हा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती होता. मनु हा राजा होता. जेव्हा पाश्चात्यांना कपडे परिधान करण्याचेही ज्ञान नव्हते, तेव्हा मनु याने ‘मनुस्मृती’ लिहिली. असे ज्ञान देणार्‍या मनु याला मी पूज्य मानतो. अनेक देशांनी कायदे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला. ‘मनुस्मृती’, ‘वेद’ आणि अन्य धर्मग्रंथांचा अवमान सहन करू नका, असे आवाहन भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी ‘मनुस्मृतीवर होणारे राजकारण कसे रोखावे ?’, या विषयावर मार्गदर्शन करतांना केले.

धर्मप्रसारासाठी अधिकाधिक संत निर्माण होणे आवश्यक ! – बाल सुब्रह्मण्यम्, संचालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू

बाल सुब्रह्मण्यम्, संचालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू
बाल सुब्रह्मण्यम्, संचालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू

पूर्वी मंदिरांतून हिंदूंना संस्कार मिळत होते. आता सरकारी धोरणांमुळे ते बंद झाले आहे. त्यामुळे हे संस्कार आश्रमात मिळू शकतात. आश्रमात असलेल्या संत-महात्म्यांमुळे लोकांच्या धार्मिक प्रश्नांना उत्तरे मिळतात, तसेच गावामध्ये संत किंवा महात्मा आल्यामुळे वातावरणात चांगला पालट होतो. त्यामुळे समाजात धर्मप्रसार होण्यासाठी अधिकाधिक संत निर्माण झाले पाहिजेत. त्यामुळे हिंदु संस्कार जिवंत रहातील, असे प्रतिपादन ‘मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट’चे संचालक श्री. बाल सुब्रह्मण्यम् यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी केले.

श्री. बाल सुब्रह्मण्यम् म्हणाले, ‘‘वेद, पुराणे, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांमध्ये एकही शब्दाचा पालट न होता ते आपल्यापर्यंत पोचले आहेत. हे केवळ गुरु-शिष्य परंपरेमुळे झाले. त्यामुळे आपण गुरु-शिष्य परंपरेचा आदर केला पाहिजे. हे अनमोल ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे आपले दायित्व आहे. आपल्या धर्मातील ज्ञान ही आपली संस्कृती आहे. इंग्रजाचे शासन येण्यापूर्वी भारतात लक्षावधी गुरुकुल होते. त्यामुळे समाजाला धर्मशिक्षण आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण मिळत होते. आज लोकांना धर्मशिक्षण मिळत नाही; म्हणून धर्मांतर होत आहे. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, ‘मुले शाळांमध्ये जात नसतील, तर शाळा त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत’, हे लक्षात घेऊन आम्ही ‘वनवासी लोकांना शिक्षण मिळावे’, यासाठी गावांमध्ये ‘एकल विद्यालये’ चालू केली. त्या माध्यमातून नैसर्गिक वातावरणात गावातील मुलांना मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते. अशा प्रकारे देशभरात ७० सहस्र एकल शाळा चालू आहेत.’’

प्रत्येक राज्यात हिंदु विचारवंतांचे संघटन होणे आवश्यक ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकमध्ये एका डॉक्टर हिंदु युवती आणि हमाल मुसलमान युवक यांचा आंतरधर्मीय विवाह असल्याची माहिती विवाह नोंदणी कार्यालयाकडून वृत्तपत्रांमध्ये प्रसारित करण्यात आली. याविषयीचा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांवरून प्रसारित झाल्यावर २ घंट्यांमध्येच एका मुसलमान व्यक्तीने याविषयी कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन केले. काही मुसलमान अधिवक्त्यांनी याविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विवाह नोंदणी कार्यालयाकडून केले जाणारे प्रसारण न करण्याची मागणी केली. एका संदेशावरून केवळ २ दिवसांमध्येच मुसलमान यासाठी एकवटले. हिंदूंनीही अशा प्रकारची संपर्कव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु विचारवंतांचे संघटन आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध राज्यांत हिंदु विचारवंतांचे संघटन केले जात आहे. यामुळे हिंदूंचा दबावगट निर्माण होऊ शकेल, तसेच हिंदु धर्मावरील वैचारिक आक्रमणाला योग्य प्रकारे प्रत्युत्तर देता येईल.

जेथे धर्म आहे तेथे विजय आहे ! – पू. डॉ. शिवनारायण सेन, सहसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता

पू. डॉ. शिवनारायण सेन, सहसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता
पू. डॉ. शिवनारायण सेन, सहसचिव, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता

बंगालमधील संत पंडित उपेंद्र मोहन यांचे प्रारंभीचे जीवन कष्‍टमय होते. विवाहानंतर पत्नीच्‍या विनंतीवरून त्‍यांनी चंडीपाठ केला. ‘जे चंडीपाठ करतील त्‍यांची सर्व प्रकारची दु:खे मी दूर करते’, असे चंडीपाठामध्‍ये देवीने म्‍हटले आहे. त्‍याची प्रचीती घेण्‍यासाठी त्‍यांनी चंडीपाठ चालू ठेवला. एका वर्षानंतर त्‍यांना त्‍याविषयी अनुभूती आली. त्‍यांची अडलेली बरीच कामे झाली. त्‍यांनी चंडीपाठाचे पठण अखंड चालू ठेवले. अडीच वर्षांनंतर प्रत्‍यक्ष भगवान त्‍यांच्‍यासमोर प्रकट होऊन त्‍यांना म्‍हणाले, ‘‘माझ्‍यासोबत चल, मी तुम्‍हाला न्‍यायला आलो आहे.’’ त्‍यांनी देवासोबत जाण्‍यास नकार दर्शवला. ते देवाला म्‍हणाले ‘तुम्‍ही एवढे दयाळू आहात, हे इतरांना सांगितल्‍याविना मी तुमच्‍यासोबत येणार नाही. जग देवाला विसरले आहे. त्‍याविषयी देवाच्‍या मनात वेदना आहेत. देवाच्‍या या वेदना दूर केल्‍याविना मी येणार नाही.’’ पंडित उपेंद्र मोहनजी यांच्‍या जीवनातील हा प्रसंग कोलकाता, बंगाल येथील शास्‍त्र धर्म प्रचार सभेचे सहसचिव पू. डॉ. शिबनारायण सेन यांनी येथे बोलतांना सांगितला. ‘पंडित उपेंद्र मोहनजी यांचे हिंदु राष्‍ट्रासंबंधी विचार’ या विषयावर बोलतांना त्‍यांनी पंडितजींचा जीवनपट उघड केला. ‘धर्म आहे तेथे विजय आहे’, यावर त्‍यांची श्रद्धा होती, असे पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी सांगितले.

पू. डॉ. सेन म्‍हणाले की, पंडित उपेंद्र मोहनजी म्‍हणायचे ५०० वर्षे मुसलमानांनी भारताला लुटले, मंदिरे तोडली; मात्र हिंदूंचा विश्‍वास ते तोडू शकले नाहीत. आक्रमकांनी भारताला मोठ्या प्रमाणात लुटले, तरी त्‍यावेळी भारताची आर्थिक स्‍थिती जगात भक्‍कम होती. ब्रिटिशांनी वर्ष १९३६ मध्‍ये देशात संस्‍कृत शिकवण्‍यास बंदी घातली. पंडित उपेंद्र मोहनजी यांनी त्‍याला विरोध करतांना ‘संस्‍कृतद्रोह हे पाप आहे’, असे ब्रिटीशांना सुनावले. पंडित उपेंद्र मोहनजी जिल्‍हाधिकारी बनले. या सरकारी पदावर कार्यरत असतांना त्‍यांनी भारतीय संस्‍कृती, परंपरा आणि नीतीमूल्‍ये जपण्‍याचा प्रयत्न केला. त्‍यासाठी त्‍यांनी सरकारी नोकरीचे त्‍यागपत्र दिले. जर्मनीने केलेल्‍या जनसंहाराचा त्‍यांनी निषेध केला. जर्मनी आणि जपान यांनी केलेल्‍या अधर्माचे फळ त्‍यांना भोगावे लागेल, असे ते म्‍हणाले होते आणि पुढे तसेच घडले, असे पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी शेवटी सांगितले.

Related News