Menu Close

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा : उद्बोधन सत्र – न्याय आणि राज्यघटना

डावीकडून विक्रम भावे (सनातन चे साधक), अधिवक्ता घनश्याम उपाध्याय (अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई), प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा, अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर (उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र)
डावीकडून विक्रम भावे (सनातन चे साधक), अधिवक्ता घनश्याम उपाध्याय (अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई), प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा, अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर (उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र)

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटल्याचा निवाडा न्यायालय आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आधीच ठरवला होता ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र
अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला अन्य खटल्यांहून वेगळा होता. या खटल्याचा निवाडा काय द्यायचा आहे ? हे न्यायालय आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आधीच ठरवले होते, असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटत होते. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ज्या २ आरोपींना शिक्षा केली आहे, त्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. त्यात हे दोन्ही आरोपी निर्दाेष मुक्त होतील, याची आम्हाला निश्चिती आहे, असे ठाम मत दाभोलकर हत्या प्रकरणातील अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सहाव्या दिवशी व्यक्त केले. या वेळी व्यासपिठावर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, सनातनचे साधक श्री. विक्रम भावे आणि तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. राजा सिंह लोध उपस्थित होते.
अधिवक्ता साळसिंगीकर म्हणाले,

१. ‘‘हा खटला लढवण्यासाठी मिळाला, तेव्हा  ‘आपल्या विचारांसाठी लढण्याची संधी मिळाली आहे’, असे मला वाटले.  दाभोलकर हत्या प्रकरणाचे मुख्य अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग साक्ष देतांना त्यांच्याकडे कागदपत्रांचा संच होता; पण त्यांची उलट तपासणी करतांना तो संच अचानक गायब झाला होता. त्या वेळी न्यायालयाचे सभागृह खचाखच भरले होते. या संचाविषयी एस्.आर्. सिंग यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तो शोधण्यात बराच वेळ गेला. तो सापडल्यावर त्यातील काही कागद गहाळ झाल्याचे दिसून आले. या खटल्यात सरकारी बाजूच्या लोकांना अधिकाधिक वेळ देण्यात आला, तर आम्हाला अल्प वेळ दिला गेला. एकूणच या खटल्यामध्ये अनेक प्रसंगांत न्यायालयात पक्षपातीपणा झाला.

२. एका साक्षीदाराची साक्ष चालू होती. तेव्हा त्याला विचारण्यात आले की, तुम्हाला  साक्ष कशी सांगायची, हे कुणी पढवले होते का ? त्याच वेळी न्यायालयाच्या सभागृहातून एक व्यक्ती उठून जात असल्याचे दिसले. त्यानंतर साक्षीदाराने त्या पळून जाणार्‍या व्यक्तीकडे पाहून त्यांनीच मला साक्ष देण्याविषयी समजावल्याचे सांगितले. ती व्यक्ती अंनिसची पदाधिकारी होती. ही गोष्ट न्यायाधिशांनी सहजतेने घेतली. या प्रकरणात आरोपींवर ‘यु.ए.पी.ए.’ (बेकायदेशीर गुन्हेगारी (प्रतिबंध) कायदा) लावण्यात आला होता. एकेरी हत्येत हा कायदा लावणे चुकीचे होते.’’

न्यायव्यवस्थेत पालट होण्यासाठी आंदोलन छेडणार ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई

अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई
अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण हे हत्येचे एक प्रकरण आहे; मात्र त्याला सर्व अन्वेषण यंत्रणांनी वेगळेच वळण दिले. सनातनच्या साधकांना या प्रकरणात गोवणे, या एकमेव उद्देशाने हा खटला चालवण्यात आला. त्याच दिशेने एकाच पद्धतीने हा खटला पुढे नेण्याचा प्रयत्न या यंत्रणांनी केला. कुठल्या तरी मोठ्या दबावाखाली या प्रकरणाचे अन्वेषण केले जात होते. अशा वेळी न्यायाधीश निष्पक्ष रहात नाही. या प्रकरणावर उच्च न्यायालय  बारीक लक्ष ठेवून होते. त्यामुळेही सर्वांवर त्याचा दबाव होता. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले; मात्र त्यामध्ये विरोधाभास होता. हे प्रकरण न्यायालयाने अनेक वर्षे रेंगाळत ठेवले आणि सनातनच्या साधकांना त्याचा मनस्ताप सोसावा लागला अन् सनातन संस्थेची अपरिमित हानी केली. सद्यःस्थितीत न्यायव्यवस्थेत पालट होण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असे विधान हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता घनश्याम उपाध्याय यांनी केले.

अधिवक्ता घनश्याम उपाध्याय पुढे म्हणाले की, आज न्यायालयात ‘हिंदु विरुद्ध अहिंदु’ असा लढा चालू आहे. सध्याच्या नक्षलवादी आणि साम्यवादी विचारसरणी असणार्‍या न्यायाधिशांना ऐषोआरामात जीवन जगायचे आहे. त्यांना धर्म, संस्कृती, मर्यादा यांचे पडलेले नाही. या न्यायाधिशांना धर्माविषयी काहीच ज्ञान नाही. न्यायाधिशांना न्यायशास्त्र, मर्यादा, धर्मशास्त्र, धर्म-अधर्म यांचे ज्ञान असेल, तर ते व्यवस्थित न्यायदान करू शकतात. राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही लोकांची ‘इकोसिस्टम’ खूप प्रभावी आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आपला दबावगट सिद्ध करणे महत्त्वाचे आहे.

सीबीआयचे अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करीन ! – विक्रम भावे, सनातन संस्थेचे साधक

विक्रम भावे, सनातन संस्थेचे साधक
विक्रम भावे, सनातन संस्थेचे साधक

सीबीआयचे अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी मला खोट्या आरोपाखाली अटक केली होती. ‘दुसर्‍या राज्यातील एका प्रकरणाखाली अटक करण्यात येत आहे’, असे सिंग यांनी मला सांगितले. सुभाष रामरूप सिंग यांनी माझ्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले. मी जामिनासाठी अर्ज केला; परंतु  माझा जामीनअर्ज फेटाळण्यात आला. माझ्यावर आतंकवादाचा आरोप असल्याचे खोटेच सांगून मला जामीन संमत करण्यात आला नाही. त्यामुळे मी कुठलाही गुन्हा केलेला नसतांना मला २ वर्षे कारावासात खितपत पडावे लागले. पुढे न्यायालयाने माझी निर्दाेष मुक्तता केली. त्यामुळे चूक नसतांना मला २ वर्षे कारावासात डांबून ठेवले गेले, हे न्यायालयात सिद्ध झाले. सीबीआयचे अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी सूडभावनेने माझ्यावर अन्याय केला. अशा सुभाष सिंग यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करीन.

आमच्या मनात निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या मुक्ततेसाठी अग्नी धगधगत असतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

आज उपस्थित सर्व अधिवक्ते परमपूज्य गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) दिलेले हिरे आहेत. त्यांनी कोणताही मोबदला न घेता दिवसरात्र संशोधन करून अन् न्यायालयात जाऊन हिंदुत्वनिष्ठांसाठी खटले लढले. हे अत्यंत कठीण आहे. आमच्या मनात निरपराध हिंदुत्वनिष्ठांना कारागृहातून बाहेर काढण्यासाठी अग्नी धगधगत असतो. ही आग दिवसेंदिवस अधिक प्रज्वलित होईल.

क्षणचित्र
मनोगत व्यक्त करण्यापूर्वी अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांचा भाव जागृत झाला होता.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा
प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा

अनेकांनी प्राणांचा त्याग केला, तेव्हाच भारताला स्वातंत्र्य मिळाले. गुरु गोविंदसिंह यांनी स्वत:च्या मुलांसह बलीदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसह अनेक क्रांतीकारक यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग केला. देशासाठी बलीदान देणार्‍यांची आठवण ठेऊया. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही हरतर्‍हेचे प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध यांनी केले.

आमदार टी. राजा सिंह लोध यांनी मांडलेले जाज्वल्य विचार
१. मी राजकारणामध्ये सत्तेसाठी आलेलो नाही, तर रामराज्याची स्थापना करण्यासाठी आलो आहे. अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे नाटक करतात. सत्ता प्राप्त झाल्यावर मात्र धर्मनिरपेक्ष होतात.

२. नुकत्याच झालेल्या बकरी ईदच्या दिवशी गायींचे रक्षण करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरला नाही. आम्ही रात्रभर गायींच्या रक्षणासाठी कार्यरत होतो. त्यामुळे तेलंगाणामध्ये गाय कापणार्‍यांना १०० वेळा विचार करावा लागतो.

३. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून राष्ट्राचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. सध्या प्रशासनातील मोठे अधिकारी हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. हिंदुत्वनिष्ठ युवकांना उच्च पदापर्यंत पोचवा, जेणेकरून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देऊ शकतील.

४. जोपर्यंत देशात धर्मनिरपेक्ष नेते आहेत, तोपर्यंत भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येऊ शकत नाही. किमान ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणणे आवश्यक आहे, जे संसदेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करतील.

५.  येणारा काळ कठीण आहे. धर्मकार्य करायचे असेल, तर घाबरून चालणार नाही. केवळ बोलून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. त्यासाठी झगडावेच लागेल.

हिंदुत्वासाठी संघर्ष करणार्‍यांचे अभिनंदन ! – आमदार टी. राजा सिंह लोध
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना अटक केले. डॉ. वीरेंद्र तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे यांना कारागृहात जावे लागले. यांची निर्दाेष मुक्तता झाली आहे; मात्र अद्यापही सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शिक्षा झाली आहे. हिंदू संघटित नाही, त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांवर अशी  वेळ येत आहे. ज्या अधिवक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना सोडवण्यासाठी न्यायालयीन संघर्ष केला, त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी हिंदुत्वासाठी संघर्ष केला.

भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादामुळे धर्मकार्य करू शकतो !
प्रत्येक राज्यात हिंदूंचे संघटन निर्माण करणे आवश्यक आहे, जेणेकरून सरकारवर दबाव निर्माण होईल. तेलंगाणामध्ये मी एकटाच हिंदुत्वासाठी कार्य करत आहे. साहाय्य करण्यासाठी कुणी नाही; परंतु मुख्यमंत्र्यांनाही ‘आम्ही काय करणार ?’ याचा विचार करावा लागतो; कारण भगवंत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वाद अन् हिंदुत्वनिष्ठांचे साहाय्य यांमुळे मी कार्य करू शकतो.

 … तर येणार्‍या काळात संकटांचा सामना करावा लागेल !
येणारा काळ संकटांचा आहे; परंतु साधनेने हे वातावरणाला पालटता येईल. अखंड हिंदु राष्ट्रासाठी साधना करणे आवश्यक आहे. हिंदूंचे संघटन करण्यासाठीही साधनाच आवश्यक आहे. आता चूक केली, तर येणार्‍या काळात मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.

भारताला हिंदु राष्ट्र केल्याविना थांबणार नाही !
लोकप्रतिनिधी स्वत:च्या मुलांना हिंदुत्व शिकवत नाहीत. माझी ३ मुले आहेत. धर्मकार्यासाठी एक हुतात्मा झाला, तरी अन्य २ मुलेही धर्मासाठी सिद्ध आहेत. भारताला हिंदु राष्ट्र करत नाही, तो पर्यंत मी थांबणार नाही. भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी हिंदूंनी त्याग करण्याची आवश्यकता आहे. साधनेच्या बळानेच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येऊ शकेल.

क्षणचित्रे :

१. श्री. राजा सिंह लोध व्यासपिठावर आल्यानंतर, त्यांचे भाषण चालू होण्यापूर्वी आणि भाषण संपल्यानंतर उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या. शेवटचे सत्र संपल्यानंतर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी श्री. राजा सिंह लोध यांच्यासमवेत छायाचित्र घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

२. श्री. राजा सिंह या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा कु. चंद्रशेखर सिंह यालाही घेऊन आले होते. या वेळी कु. चंद्रशेखर याने व्यासपिठावरून त्याचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थितांनी उत्साहात घोषणा देऊन त्याचे मनोबल वाढवले. या संदर्भात श्री. राजा सिंह म्हणाले की, व्यासपिठावर कसे बोलायचे ? हे केवळ हिंदु जनजागृती समितीत शिकवले जाते. त्यामुळे मी माझ्या मुलाला येथे घेऊन आलो आहे.

वडिलांप्रमाणेच ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देईन ! – कु. चंद्रशेखर सिंह लोध (टी. राजा सिंह लोध यांचा मुलगा)

कु. चंद्रशेखर सिंह लोध (टी. राजा सिंह लोध यांचा मुलगा)
कु. चंद्रशेखर सिंह लोध (टी. राजा सिंह लोध यांचा मुलगा)

या प्रसंगी भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचा मुलगा कु. चंद्रशेखर सिंह (वय १७ वर्षे) मनोगत व्यक्त करतांना म्हणाला, ‘‘ज्याप्रमाणे माझे वडील हिंदु राष्ट्रासाठी योगदान देत आहेत, त्याप्रमाणे मीही हिंदु राष्ट्रासाठी योगदान देईन. मी शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही राजकारण नंतर करा, त्या अगोदर हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करा.’’

या प्रसंगी मध्यप्रदेश येथील हिंदु युवा संघटनेचे अध्यक्ष श्री. निर्मल पाटीदार आणि ओडिशा येथील ‘गोरक्षा दला’चे अधिवक्ता सुरेशकुमार पांडा यांनी गोमातेची प्रतिमा देऊन आमदार टी. राजासिंह लोध यांचा व्यासपीठावर सत्कार केला.

हिंदु राष्ट्रासाठी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद
अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मी, विक्रम भावे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची निर्दाेष मुक्तता झाली; परंतु शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना झालेली शिक्षा ही अन्यायकारक आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. उच्च न्यायालयात त्यांचे निर्दाेषत्व सिद्ध होईल, असा आम्हाला विश्वास आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्याला रोखण्यासाठी हा खोटा खटला उभा केला गेला; मात्र यामुळे आम्ही हिंदुत्वाचे कार्य थांबवणार नाही. सत्तेसाठी काही राजकीय लोकांनी हिंदुत्वनिष्ठांना फसवण्याचा प्रयत्न केला. स्वार्थी राजकारणामुळेच हिंदुत्वनिष्ठांमध्ये फूट पडत आहे. ज्याने माता सरस्वतीदेवीचा अवमान केला, त्या नेत्याला महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात घेण्यात आले. असे स्वार्थी नेते प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. या सर्वांविरोधात हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्रासाठी काम करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. त्यांचे भाषण ‘व्हिडिओ’द्वारे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात दाखवण्यात आले.

 

Related News