Menu Close

सिंहगड रस्ता आणि मंचर (पुणे) येथील वडगाव काशिंबेग या ठिकाणी शौर्य प्रशिक्षण शिबिर

लाठीकाठीचे प्रशिक्षण करतांना युवक-युवती

पुणे (महाराष्ट्र) – सध्याच्या काळात हिंदु महिलांची वाढती असुरक्षितता, हिंदु युवतींवर होणारी प्राणघातक आक्रमणे, हिंदु युवकांवर होणारी जीवघेणी आक्रमणे आदींचा विचार करता हिंदु युवक युवतींना स्वतःचे रक्षण करता येणे ही काळाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथील दांगट पाटील इस्टेट येथे, तर मंचर (नाशिक रस्ता) येथील वडगाव काशीद काशिंबेग येथील श्रीराम मंदिरात ७ दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. दंड साखळी, लाठीकाठी प्रशिक्षण, बचाव तंत्रे आदींच्या माध्यमातून युवक युवतींनी स्वरक्षणाचे धडे घेतले. पुष्कळ युवक-युवतींनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला.

सध्याचा काळ पहाता केवळ शारीरिक स्तरावर सक्षम होणे पुरेसे नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरही सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदु युवक युवतीमध्ये मनोबल आणि आध्यात्मिक बळ असणेही अत्यंत आवश्यक आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज तरुण हिंदु युवावर्ग धर्मापासून दूर चालला आहे. त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माविषयी आदर निर्माण होणेही आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर या शौर्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी शौर्य प्रशिक्षण शिबिरे घेतली जात आहेत.

Related News