Menu Close

बरेली येथे हिंदूबहुल भागात मोहरमचा ताजिया नेण्‍यास अडचण होत असल्‍याने हिंदूंनी पुरातन पिंपळ वृक्षाची फांदी कापली

३२ वर्षांपासून या समस्‍येमुळे होत असे वाद !

  • हिंदूंची आत्‍मघातकी धर्मनिरपेक्षता ! हिंदूबहुल भागातून मोहरमचा ताजिया कशाला काढला जातो ? मुसलमानबहुल भागांतून हिंदूंची धार्मिक मिरवणूक नेण्‍यास नेहमीच विरोध केला जातो. तेथे मशिदीजवळ अशा मिरवणुकांवर हमखास आक्रमणे होतात आणि दुसरीकडे हिंदू गांधीवादी आत्‍मघातकी धर्मनिरपेक्षता दाखवून पवित्र पुरातन पिंपळ वृक्षावर आघात करतात, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !
  • दिवसभरात ५ वेळा मशिदींवरील भोंग्‍यांवरून हिंदूंना अजान ऐकवली जाते, याचा हिंदूंना त्रास होत असतांनाही मुसलमान कधी स्‍वतःहून भोंगे उतरवत नाहीत, हे लक्षात घ्‍या ! – संपादक 

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील हिंदूबहुल भागात गेल्‍या ३२ वर्षांपासून मुसलमानांच्‍या मोहरम सणाच्‍या वेळी मिरवणूक काढण्‍यात येते. त्‍या वेळी उंच ताजिया नेला जातो. याच्‍या उंचीमुळे वाटेत पुरातन पिंपळ वृक्षाची फांदी अडचणीची ठरत होती. यामुळे येथे वादही होत असत. ताजिया नेण्‍यासाठी प्रत्‍येक वर्षी या ठिकाणी ३० फूट लांब आणि ४ फूट खोल खड्डा करून त्‍यातून मिरवणूक पुढे नेली जात होती. हे प्रकार पहाता यावर्षी हिंदूंनी पुढाकार घेऊन पिंपळाची अडचणीची ठरणारी फांदी कापून टाकली.

१. या समस्‍येवर तोडगा काढण्‍यासाठी प्रथम स्‍थानिक नगरसेवक अनीस सकलैनी आणि भाजपचे पदाधिकारी संजीव मिश्रा यांच्‍यात चर्चा चालू झाली. त्‍यानंतर हिंदूंच्‍या सहमतीने फांदी तोडण्‍यात आली. ताजिया नेण्‍यात येणारा मार्ग अरुंद होता, तरीही मुसलमान याच मार्गाने ताजिया नेण्‍याचा जाणीवपूर्वक अट्टहास करत होते. त्‍यामुळेच होणारा तणाव निवळण्‍यासाठी फांदी कापण्‍यात आली.

२. एका स्‍थानिक व्‍यक्‍तीने सांगितले की, पिंपळाचे झाड २५० वर्षे जुने आहे. त्‍याला लागूनच एक मंदिर आहे. यापूर्वी कोणतीही अडचण नव्‍हती; मात्र डागडुजीमुळे रस्‍त्‍याची उंची वाढल्‍याने ताजिया नेतांना झाडांच्‍या फांद्या अडथळा ठरू लागल्‍या.

३. भाजपचे पदाधिकारी संजीव मिश्रा म्‍हणाले की, पोलीस आणि प्रशासन यांच्‍या  मध्‍यस्‍थीने अनेक बैठका झाल्‍या. हे क्षेत्र ८० टक्‍के हिंदूबहुल आहे. आम्‍ही दोन्‍ही समाजामध्‍ये एकमत घडवून आणण्‍याचा प्रयत्न केला. चर्चेनंतर फांदी तोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News