Menu Close

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून ‘रामनगर’ जिल्ह्याचे नाव पालटण्याचा प्रयत्न

भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांचा विरोध

  • काँग्रेसने कधी टिपू सुलतान, औरंगजेब, हुमायू, अकबर आदी रस्त्यांना, तालुक्यांना गावांना असलेली नावे पालटून हिंदु नावे ठेवली आहेत का ? जर काँग्रेसने असे केले, तर मुसलमान ते सहन करतील का ? हिंदूंनीही काँग्रेसला रामनगरचे नाव पालटण्याला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
  • कर्नाटकमधील काँग्रेस सरकार इस्लामी राजवट चालवत आहे, हे काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !
  • आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांच्या नावातील ‘राम’ही काढणार का ? – संपादक 

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्याचे नाव पालटण्याची प्रक्रिया चालू आहे. याला विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून विरोध केला जात आहे. ‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे भाजपने म्हटले आहे.

१. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी नाव पालटण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्याकडे पाठवला आहे. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव पालटण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. शिवकुमार आणि इतर काही जणांनी या संदर्भात सिद्धारामय्या यांच्याकडे एक पत्र देऊन विनंती केली आहे.

२. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शिवकुमार यांनी सांगितले की, बेंगळुरू शहराला असलेल्या जागतिक प्रतिष्ठेेचा लाभ शहराजवळ असलेल्या रामनगर, मगदी, कनकपुरा, चन्नपटना आणि हरोहल्ली तालुक्यांना व्हावा, हा नाव पालटण्याची मागणी करण्यामागचा उद्देश आहे.

३. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सी.एन्. अश्‍वथ नारायण यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी नाव पालटण्यासाठी पुढाकार घेतला असला, तरी ते रामनगर जिल्ह्याचा कधीही विकास करणार नाहीत. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयही तेथून अन्यत्र स्थलांतरित केले आहे.

४. माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी ‘कर्नाटमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा या जिल्ह्याचे नाव ‘रामनगर करू’, असे सांगितले.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News