सेंगर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट !
मुंबई – मुसलमान, ख्रिस्ती आणि अन्य धर्म यांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतांना महाराष्ट्रात अनुसूचित जाती, तसेच आणि इतर प्रवर्गातून कसे काय आरक्षण दिले ? हे अवैध आहे. ते रहित करा, अशी हस्तक्षेप याचिका ‘हिंदु लॉ बोर्ड’चे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, अस्पृश्यांचे मनोबल उंचावण्याकरिता त्यांना आरक्षणाचे प्रावधान केले. देशाच्या मूळ राज्यघटनेमध्ये केवळ हिंदूंनाच जातीय आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे हिंदु धर्माचा त्याग केल्यावर आरक्षणाचा लाभ घेणार्या हिंदूंचे आरक्षण आपोआपच संपते. सरकार एकाच व्यक्तीला २ धर्मांचा लाभ कसा देत आहे ? एकीकडे अल्पसंख्यांक म्हणून शासकीय सुविधांचा लाभ घेणे आणि दुसरीकडे हिंदूंचे जातीचे आरक्षणही घेणे, हे अवैध आहे.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात