Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ महानायकांना मानवंदना !

कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा सेवा समितीच्या वतीने १५ जुलै १५८३ या दिवशी पोर्तुगीज शासनाने चालवलेल्या धर्मच्छळाविरुद्ध आवाज उठवणार्‍या कुंकळ्ळीच्या १६ महानायकांना मानवंदना देण्यासाठी जलाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुंकळ्ळीच्या गावकर्‍यांचा हा उठाव युरोपीय वसाहतवादाविरुद्ध केलेला आशिया खंडातील पहिला उठाव होता. भारत सरकारने या उठावाला ‘गोवा राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारक दिवस’, असे घोषित केले आहे. गेल्या ६ वर्षांपासून श्री शांतादुर्गा सेवा समिती हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचावा या उद्देशाने जलाभिषेक तथा व्याख्यान आयोजित करत आहे.

जलाभिषेक करतांना हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोलंकी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंकळ्ळीच्या १६ महानायकांना मानवंदना देतांना समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी कुंकळ्ळी येथील स्मारकावर जलाभिषेक केला.

‘इन्क्विझिशन’विषयीचे (धर्मच्छळाविषयीचे) फलक प्रदर्शन पहातांना पुराभिलेख अन् पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि त्यांचे सहकारी

या ठिकाणी समितीच्या वतीने गोव्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयीचे (धर्मच्छळाविषयीचे) फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. पुराभिलेख अन् पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह अनेकांनी या फलक प्रदर्शनाला भेट देऊन ते पाहिले.

Related News