जयसिंगपूर (कोल्हापूर, महाराष्ट्र) – विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी आणि शिवप्रेमी अन् निरपराध हिंदूंवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयात देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन नायब तहसीलदार योगेश जामदाडे यांनी स्वीकारले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे, भाजप जिल्हा चिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, भाजप शहर चिटणीस श्री. सुनील ताडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे उपस्थित होते.