Menu Close

जिहाद्यांची कंबर मोडण्‍यासाठी पुन्‍हा रस्‍त्‍यावर उतरणार – आमदार नीतेश राणे, भाजप

आमदार नीतेश राणे

मुंबई – विशाळगडावरील अतिक्रमण, लव्‍ह जिहाद आणि भूमी जिहाद यांच्‍या वाढत्‍या घटना पहाता जिहाद्यांचे इस्‍लामीकरणाचे प्रयत्न जोराने चालू आहेत. त्‍यांची मस्‍ती वाढली आहे. ही मस्‍ती उतरवण्‍याची आवश्‍यकता आहे. जिहाद्यांची कंबर मोडण्‍यासाठी पुन्‍हा रस्‍त्‍यावर उतरणार आहोत, असे वक्‍तव्‍य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. २४ जुलै या दिवशी भाजपच्‍या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

१. आमदार नीतेश राणे पुढे म्‍हणाले, ‘‘आमचे सरकार हिंदुत्‍वनिष्‍ठ आहे. आमचा अजेंडाच (कार्यसूचीच) हिंदुत्‍वाचा आहे. हिंदुत्‍वाशी आम्‍ही तडजोड करणार नाही. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर हिंदूंच्‍या विरोधात षड्‍यंत्र चालू आहे. कॅनडा, फ्रान्‍स येथे हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर हिंदूविरोधी काम करणार्‍यांशी राहुल गांधी यांनी हातमिळवणी केली आहे. हिंदूंच्‍या सुरक्षिततेसाठी नरेंद्र मोदी यांना निवडून आणणे आवश्‍यक होते.’’

२. चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयात धार्मिक पोषाखाला बंदी घातल्‍याच्‍या निर्णयामुळे मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा घालता येत नाही. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍नावर नीतेश राणे म्‍हणाले की, महाविद्यालयात गणवेश निश्‍चित करण्‍याचा अधिकार महाविद्यालयाला आहे. मुसलमान विद्यार्थिनींनी ठरवावे की, त्‍यांना शिक्षणापेक्षा अन्‍य काही महत्त्वाचे आहे का ?

दिशा सालियन मृत्‍यूप्रकरणातील सत्‍य अनिल देशमुख यांनी सांगावे !

आदित्‍य ठाकरे यांच्‍या निकटवर्तियांनी दिशा सालियन हिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार करून तिला सज्‍जातून फेकून दिले. हे सत्‍य सांगण्‍याचे धारिष्‍ट्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखवावे. हे सत्‍य त्‍यांनी सांगावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांना सांगायला सांगितले होते. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असतांना गुन्‍हेगारांना साहाय्‍य केले. दिशा सालियन हिच्‍या हत्‍येशी आदित्‍य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे ?, हे अनिल देशमुख यांनी सांगावे, असेही आमदार नीतेश राणे यांनी म्‍हटले.

दिशा सालियन ही अभिनेते सुशांत राजपूत यांची माजी व्‍यवस्‍थापक होती. गच्‍चीतून खाली पडल्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाल्‍याचे सांगितले जाते; मात्र तिची हत्‍या केल्‍याचा आरोप काही जण करत आहेत. या घटनेच्‍या काही महिन्‍यांनतर सुशांत राजपूत यांनीही आत्‍महत्‍या केली होती.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News