Menu Close

कर्नाटकातील रामनगर जिल्‍ह्याचे नाव झाले ‘बेंगळुरू दक्षिण’

काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेषी निर्णय !

रस्‍ते, गाव, शहर, जिल्‍हे यांना असलेली मोगलांची नावे काँग्रेसने कधी पालटली नाहीत; मात्र रामाचे नाव असणार्‍या जिल्‍ह्याचे नाव काँग्रेसने पालटले. यातून ‘काँग्रेस सरकार म्‍हणजे इस्‍लामी राजवट’ हे पुन्‍हा एकदा सिद्ध होते ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे लज्‍जास्‍पद ! -संपादक 

कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्‍हा आता ‘बेंगळुरू दक्षिण’ म्‍हणून ओळखला जाईल. मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत रामनगर जिल्‍ह्याचे नाव पालटण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. सरकारच्‍या या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे.

कर्नाटकचे कायदा आणि संसदीय मंत्री एच्.के.पाटील म्‍हणाले की, लोकांच्‍या मागणीच्‍या आधारे आम्‍ही रामनगर जिल्‍ह्याचे नामकरण ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍याची प्रक्रिया महसूल विभागाकडून प्रारंभ करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्याचे केवळ नाव पालटले आहे. बाकी सर्व काही जसे होते तसेच राहील. त्‍याला ‘ब्रँड बेंगळुरू’ असे म्‍हटले जाईल. बेंगळुरू हा एक ‘ब्रँड’ (एखाद्याविषयी वेगळी धारणा किंवा ओळख असणे) आहे. याचा कुणालाच लाभ होणार नाही, असे म्‍हटले, तर ते चुकीचे आहे. नाव पालटणे सर्वांना लाभदायक ठरणार आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News