Menu Close

सरकारने लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा ! – अतुल भेंडे, विश्व हिंदु परिषद

पनवेल येथे यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आंदोलन !

आंदोलनात सहभागी राष्ट्रप्रेमी

पनवेल (महाराष्ट्र) – उरण येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे. सरकारने आमच्या भावना समजून लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी मी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे, असे विधान विश्व हिंदु परिषेदेचे श्री. अतुल भेंडे यांनी केले. यशश्रीच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथे ३१ जुलै या दिवशी आंदोलन करण्यात आले. त्यात ते बोलत होते. पुष्कळ राष्ट्र आणि धर्म प्रेमींनी या आंदोलनात सहभाग घेतला.


उपस्थित मान्यवरांचे विचार !

महिला शक्ती जागृत व्हायला हवी ! – सौ. सीताताई पाटील, भाजपच्या उपमहापौर, पनवेल

यशश्री शिंदे माझ्याच गावातील होती. तिला फसवले गेले आहे. दाऊद शेख या नराधमाला लगेच फाशी द्यावी. त्याच्यावर वेळीच कारवाई झाली असती, तर यशश्रीची हत्या करण्याचे त्याचे धाडस झाले असते. आज माझ्या बहिणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत. अशाच प्रकारे एकत्र येऊन आपण विरोध करायला हवा. महिला शक्ती जागृत व्हायला हवी. मी हिंदु जनजागृती समितीचे आभार मानते की, या आंदोलनामुळे आम्हाला आमच्या भावना व्यक्त करता आल्या.

लव्ह जिहादच्या संदर्भात हिंदु मुलींमध्ये जागृती करायला हवी ! – भीमराव पोवार, पनवेल शहर कमिटी, भाजप

मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यावर कायमचा उपाय म्हणजे ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणे हाच आहे. लव्ह जिहादच्या संदर्भात हिंदु मुलींमध्ये जागृतीही करायला हवी.


उपस्थित मान्यवर : पनवेल येथील गायत्री परिवाराचे श्री. प्रद्युम्न शर्मा, उषाकिरण शर्मा; हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्तेडॉ. उदय धुरी; राजस्थानी समाजाचे श्री. भैरु सिंग, अधिवक्ता नितीन मिश्र; खांदा कॉलनी, पनवेल येथील भाजपच्या उपमहापौर सौ. सीताताई पाटील, भाजपच्या पनवेल शहर कमिटीचे श्री. भीमराव पोवार; नारीशक्ती  संघटनेच्या उपाध्यक्षा श्रीमती प्रतिमा चौहान

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सुश्री (कु.) प्रतीक्षा कोरगावकर आणि डॉ. उदय धुरी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

क्षणचित्र : महिला आणि युवक रस्त्याने जातांना त्यांनी थांबून विषय समजून घेतला अन् उत्स्फूर्तपणे घोषणा देत तेही आंदोलनामध्ये सहभागी झाले.

Related News