मंदिर असलेल्या गावावरही सांगितला अधिकार !
असे हास्यास्पद, परंतु संतापजनक दावे करणार्यांना ‘सामाजिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे ! -संपादक
नवी देहली – केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या(WAQF Board) अधिकारांवर निर्बंध आणण्याची योजना आखत आहे. लवकरच संसदेत वक्फ बोर्ड अधिनियम कायद्यातील सुधारणा विधेयक सादर केले जाईल. या नव्या विधेयकात कुठल्याही भूमीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल. गेल्या काही वर्षांमध्ये वक्फ कायद्याच्या गैरवापराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी एक प्रकरण तमिळनाडूमधील आहे, जिथे वक्फ बोर्डाने चक्क एका गावावरच दावा केला आहे.
१. तमिळनाडूच्या तिरुची जिल्ह्यातील तिरुचेंथुराई गावात वक्फ बोर्डाने १ सहस्र ५०० वर्षे प्राचीन मानेंदियावल्ली चंद्रशेखर स्वामी मंदिराच्या भूमीच्या मालकीचा दावा केला आहे. मंदिराची या परिसरात ३६९ एकर भूमी आहे. इस्लामचा उदयच १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी झाला आहे.
२. या दाव्यामुळे शेतकरी आणि इतर ग्रामस्थही आश्चर्यचकित झाले आहेत.
३. गावातील एक शेतकरी राजगोपाल यांच्या म्हणण्यानुसार निबंधकांनी त्यांना सांगितले की, तमिळनाडू वक्फ बोर्डाने विक्री करार (सेल डीड्स) विभागाला २५० पानांचे पत्र पाठवले आहे, ज्यात म्हटले आहे की, तिरुचेंदुराई गावातील भूमीविषयीचा व्यवहार बोर्डाच्या ना हरकत प्रमाणपत्रानेच केला जावा.
४. याखेरीज वक्फ बोर्डाने तमिळनाडूतील १८ गावांच्या भूमीवरही त्याचा दावा ठोकला आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, सरकारने वर्ष १९५४ च्या सर्वेक्षणानुसार त्यांना ही भूमी दिली आहे.
५. हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील जथलाना गावातील गुरुद्वाराची भूमी वक्फला हस्तांतरित करण्यात आली आहे.
६. गुजरातमधील सुरत महानगरपालिकेचे मुख्यालय वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आले होते. शाहजहान बादशाहाने ही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून त्याच्या मुलीला दान केल्याचा दावा बोर्डाने केला होता.
७. सुन्नी वक्फ बोर्डाने चक्क ताजमहालवर दावा केला होता. तसेच ही सुन्नी वक्फची मालमत्ता म्हणून घोषित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयासमोर केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शाहजहानकडून स्वाक्षरी केलेली कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात