स्विडन येथील कट्टर मुसलमानविरोधी नेता सलवान मोमिका यांचे वक्तव्य
जे युरोपातील एका नेत्याला वाटते, ते भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना अथवा राजकीय पक्षांना का वाटत नाही ? कि वाटते, पण बोलण्याचे धाडस करत नाहीत ? -संपादक
स्टॉकहोम (स्विडन) – सलवान मोमिका या कट्टर मुसलमानविरोधकाने बांगलादेशातील हिंदूंच्या दैनावस्थेच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, जगाचे डोळे कुठे आहेत ? बांगलादेशातील मुसलमानांकडून तेथील हिंदूंचा नरसंहार होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे आहे.
मोमिका यांनी कुराणच्या प्रती अनेक वेळा प्रशासनाची अनुमती घेऊन जाळल्या आहेत. यासाठी ते सामूहिक कार्यक्रमांचेही आयोजन करत असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार कुराण हेच जागतिक स्तरावरील आतंकवाद वाढण्यामागील मूळ कारण आहे.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात