Menu Close

बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्‍याने त्‍यांची स्‍थिती विदारक

  • अनेक हिंदु गावांवर आक्रमण !

  • शेकडो हिंदू गंभीर घायाळ !

  • हिंदूंची घरे लुटली !

  • अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची जाळपोळ

भारतातील हिंदूंनो, ‘बांगलादेशातील या घटना वर्तमान असून हे तुमचे भविष्‍य आहे’, हे शब्‍द विसरू नका ! हिंदू संघटित झाले नाहीत, तर भगवंताने तरी तुमचे रक्षण का करावे ? -संपादक 

ढाका (बांगलादेश) – पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्‍या पलायनानंतर आतापर्यंत तब्‍बल ४३ जिल्‍ह्यांमध्‍ये मंदिरांवर आक्रमणे करण्‍यात आली आहेत.  बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती अत्‍यंत भयावह होत चालली आहे. तेथील काही हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ला तेथील प्रत्‍यक्ष स्‍थितीची माहिती सांगणारे २ अहवाल पाठवला आहेत. भारत आणि विदेशांतील प्रसारमाध्‍यमे यांनी प्रसारित न केलेली बरीच माहिती हाती आली आहे. या अहवालांनुसार आक्रमणकारी जिहाद्यांनी देशातील २७ जिल्‍ह्यांतील तब्‍बल ५० हून अधिक पोलिसांना ठार मारले असून एकूण ४६० लोक मारले गेले आहेत. आपत्‍कालीन स्‍थितीमुळे मृतांचा प्रत्‍यक्ष आकडा समजू शकलेला नाही.

अंतर्वस्‍त्रे तपासून पुरुष हिंदु आहे कि मुसलमान याची पडताळणी; हिंदू असल्‍याचे समोर आल्‍यास आक्रमण !

या अहवालांनुसार जिहादी आंदोलनकर्ते पुरषांना मारतांना त्‍यांची अंतर्वस्‍त्रे तपासून ते हिंदु आहेत कि मुसलमान, याची पडताळणी करत आहेत. (जे मुसलमान झाले आहेत, त्‍यांची सुंता झालेली असते) हिंदू असल्‍याचे लक्षात आल्‍यावर त्‍यांना ठार मारण्‍याचे प्रयत्न होत आहेत. अशा प्रकारच्‍या घटना जत्राबारी, बड्डा, वातारा, महंमदपूर, अदाबोर, मिरपूर, पलटन, शाह अली आणि उत्तरा पूर्व या पोलीस ठाण्‍यांच्‍या हद्दीत घडल्‍याचे स्‍थानिक प्रसारमाध्‍यमांनी सांगितले. हिंदूंना वेचून ठार मारण्‍याचे प्रकार चालू आहेत.

एका हिंदु पोलीस अधिकार्‍याला ठार करून मृतदेह झाडावर लटकवला !

एका हिंदु पोलीस अधिकार्‍याने रक्षणासाठी पोलीस ठाण्‍यात आश्रय घेतला असता त्‍यांना सैन्‍याच्‍या गाडीतून तेथून काढण्‍यात आले आणि त्‍यानंतर जिहाद्यांनी त्‍यांना ठार मारले आणि जमावाने त्‍यांचा मृतदेह झाडावर लटकवला.

५ ऑगस्‍टला हिंदूंवर झालेल्‍या जिहाद्यांच्‍या आक्रमणांची माहिती !

१. श्रीबोर्दी उपजिल्‍हा, जिल्‍हा शेरपूर : सुमन नावाच्‍या एका हिंदु नेत्‍याच्‍या घरावर आक्रमण करून त्‍यांचे घर लुटले.

२. हैसगती, रूपशा, जिल्‍हा शेरपूर : श्‍यामलकुमार दास आणि सजनकुमार दास या हिंदूंच्‍या घरांना लुटले, तसेच घरांना आग लावण्‍यात आली.

३. तुटपारा, जिल्‍हा खुलना : बिमन बिहारी आणि अनिमेश सरकार रिंटू यांची घरे लुटली आणि पाडण्‍यात आली.

४. दाकोप, बनीशंतर, जिल्‍हा खुलना : स्‍थानिक सरकारी परिषदेचे सदस्‍य असलेले जयंतो गेन यांच्‍यावर आक्रमण करण्‍यात आले. यात ते गंभीर घायाळ झाले. त्‍यांचे घर लुटून ते पाडण्‍यात आले.

५. फुलताला, जिल्‍हा दिनाजपूर : स्‍थानिक मुसलमानांनी मंदिराची भूमी कह्यात घेतली.

६. पर्वतीपूर, जिल्‍हा दिनाजपूर : मुसलमानांनी हिंदूंची ५ मंदिरे उद़्‍ध्‍वस्‍त केली आणि हिंदूंना घायाळ केले.

७. नोरशिंडी, कालीबारी : डॉ. दिपोक साहा यांच्‍यावर मुसलमान जमावाने आक्रमण केले आणि अनेक हिंदु कुटुंबांना लुटले.

८. चंद्रगंज, लक्ष्मीपूर : येथील श्री गौतम साका यांच्‍यावर आक्रमण करण्‍यात आले आणि त्‍यांचे घर लुटण्‍यात आले. ते गंभीर घायाळ झाले.

९. आगरपूर, कुलियाचोर, किशोरगंज : गावातील नुकुल कुमार आणि सुशांत दास यांच्‍यावर आक्रमण करण्‍यात आले. संपूर्ण गाव लुटले.

१०. रौसन, जिल्‍हा चटगांव : उज्‍ज्‍वल चक्रवर्ती यांच्‍यावर झालेल्‍या आक्रमणात ते घायाळ झाले. त्‍यांचे घर लुटले.

११. धोपडी, पालपारा, आवईनगर : या गावात ३ हिंदु कुटुंबांवर आक्रमण करून त्‍यांचे घरे लुटण्‍यात आली.

१२. बबलू साहा, गाव नरिकल बारिया, बागारपारा, जेसोर : येथील स्‍थानिक सरकारचे हिंदु अध्‍यक्ष यांच्‍यावर आक्रमण करण्‍यात आले आणि त्‍यांच्‍या घरातून सर्व सामान लुटले.

१३. पदमपुकुर, झिकरगाचा, जेसोर : कुमार चंद्र दास यांचे घर लुटण्‍यापूर्वी त्‍यांच्‍यावर आक्रमण करून त्‍यांना घायाळ केले.

१४. कोलारोया, सातखीरा : डॉ. सुब्रत घोष आणि बिस्‍वजित साधू यांच्‍यावर आक्रमण करून घायाळ केले. त्‍यांनतर त्‍यांची घरे लुटली.

१५. शायस्‍थगंज, हबीगंज : असित कुमार बरन यांच्‍यावर आक्रमण करून घायाळ केले.

५ ऑगस्‍टला लुटण्‍यात आलेली हिंदूबहुल गावे !

कैरा, दसपाडा, (जिल्‍हा खुलना); सताबगंज, बोचागंज, (जिल्‍हा दिनाजपूर); धल्ला, चिरीरबंदर; कसाबपूर, जेसोर; लोहागोरा, नोराइल या हिंदु बहुसंख्‍य असलेल्‍या गावांतील हिंदूंवर आक्रमणे केली, तसेच त्‍यांना घायाळ करून त्‍यांची घरे लुटली.

६ ऑगस्‍टला हिंदूंवर झालेल्‍या जिहाद्यांच्‍या आक्रमणांची माहिती !

चटगांव जिल्‍हा

१. बजालिया गावातील तपश कांती दत्ता यांच्‍यावर आक्रमण केल्‍याने ते घायाळ झाले, तसेच त्‍यांचे घर लुटले.

२. अभियंता लिखन दास यांच्‍यावर आक्रमण, तसेच त्‍यांचे औषधाचे दुकान उद़्‍ध्‍वस्‍त करून लुटले.

३. बासखली येथील सौरभ नाथ यांच्‍यावर आक्रमण करून त्‍यांचे संगणकाचे दुकान लुटले.

४. पोटेंगा येथील काजा कांती लोड यांच्‍यावर आक्रमण !

५. सदर चकबाजारसह दोन हिंदु गावांवर आक्रमण करून लुटले.

दिनापूर जिल्‍हा

१. देबाशिष भट्टाचीया, विकास चक्रवर्ती आणि संजीब बिस्‍वास यांच्‍यासह १७ हिंदु कुटुंबांवर आक्रमण ! त्‍यांची प्रकृती गंभीर आहे. धर्मांध जमावाने मंदिरे फोडली आणि सर्व सामान लुटले.

२. मैमनसिंहच्‍या गौरीपूर गावात प्रदीप देबनाथ यांच्‍यावर आक्रमण करून त्‍यांची दुकाने फोडली. तारकांडा आणि मैमनसिंह सदर या २ हिंदु गावांवर आक्रमण करून लुटले.

बोगरा जिल्‍हा

भबानीपूर शक्‍तीपीठ, पिरगाचा, मधुपूर, शिबगंज अशा अनेक हिंदु गावांवर आक्रमणे  करून ती लुटली.

फरीदपूर जिल्‍हा

कृष्‍णापूर, गंगामारी सदर, मधुखली येथे धर्मांध जमावाने धारदार शस्‍त्रांनी ३ हिंदूबहुल गावांवर आक्रमण केले, लोकांना घायाळ केले आणि घरे लुटली.

पिरोजपूर जिल्‍हा

रायरकाठी, गोपालपूर, पिरोजपूर सदर, नसीरपूर आणि श्रीराम काठी या ४ हिंदूबहुल गावांवर आक्रमणे करून त्‍यात नारायण रे चौधरी, गोपाल चंद्र बसू आणि दिलीप कुमार मिधा यांच्‍यासह अनेक हिंदूंना घायाळ केले.

माणिकगंज जिल्‍हा

वालुका, गोफोरगाव येथील माणिककुमार नंदी यांच्‍यावर आक्रमण करून परिसरातील हिंदु गावे लुटली, अनेक लोक घायाळ झाले.

जेसोर जिल्‍हा

मणिरामपूर, कसाबपूर, अवॉयनगर, बागरपारा आणि झिकरगाछा येथे अनेक हिंदु कुटुंबांवर आक्रमणे करून घरे अन् त्‍यांची दुकाने लुटली. नंतर दुकानांना आग लावण्‍यात आली.

७ ऑगस्‍टला झालेला हिंदूंचा नरसंहार !

अ. किमान ६ हिंदूंना (हरधन रॉय, काजल रॉय, मृणाल कांती चटर्जी, बासुदेव दास, संतोष कुमार आणि एक अज्ञात) ठार मारण्‍यात आले.

आ. किमान ३ हिंदु मुलींचे अपहरण करून २ हिंदु मुलींवर बलात्‍कार !

इ. ६१ पेक्षा अधिक हिंदु मंदिरांची तोडफोड, लूटमार आणि जाळपोळ !

ई. २६५ हून अधिक हिंदु घरांची तोडफोड आणि लूटमार !

उ. १६३ हून अधिक हिंदु व्‍यापारी दुकानांची तोडफोड, लुटमार आणि जाळपोळ !

ऊ. बांगलादेशात वास्‍तव्‍यास असलेले १ कोटी ३१ लाख हिंदू दहशतीखाली जगत आहेत. हिंदूंवरील आक्रमणाची पातळी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News