बंगालमधील माणिकजंग येथील बांगलादेशाच्या सीमेवरील घटना
कोलकाता (बंगाल) – सीमा सुरक्षा दलाने ५०० ते ६०० बांगलादेशी नागरिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. माणिकगंज सीमेजवळ ही घटना घडली. घुसखोरीचा प्रयत्न करणार्या सर्व लोकांना सीमा सुरक्षा दलाच्या उत्तर बंगाल फ्रंटियरच्या अधिकार्यांनी रोखले आणि बांगलादेशात परत पाठवले.
उत्तर बंगाल फ्रंटियरने एक निवेदन प्रसारित केले आहे की, बांगलादेशातून भारतीय सीमेकडे अल्पसंख्यांक लोकांची कुठलीही हालचाल नाही. जमलेल्या लोकांच्या मनात स्थानिक अशांततेची भीतीने होती. बांगलादेशी सैन्याने या व्यक्तींना त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले असून त्यांना त्यांच्या घरी परतण्यास प्रोत्साहित केले आहे.
बंगालमधील उत्तर दिनाजपूर, दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कूचबिहार या जिल्ह्यांना व्यापणार्या एकूण ४ सहस्र ९६ कि.मी. लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेपैकी ९३२.३९ कि.मी. लांबीच्या सीमेचे रक्षण सीमा सुरक्षा दलाच्या उत्तर बंगाल फ्रंटियरकडून केले जाते.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात