जागतिक शक्तींनी बांगलादेशातील हिंदूंचे प्राण आणि मालमत्ता यांचे रक्षण करावे ! – जगद़्गुरु नरेंद्रचार्य महाराज
नाणीज (महाराष्ट्र) – बांगलादेशामध्ये माजलेली अराजकता आणि हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबले पाहिजेत. अन्यथा आम्हा हिंदूंना हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे लागेल, अशी वेळ येऊन ठेपली आहे. क्षुल्लक कारण शोधून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. बांगलादेश येथे लोकसंख्येच्या ८.५४ टक्के हिंदू आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य आहेत; म्हणूनच जाणीवपूर्वक हिंदूंची मंदिरे, घरे, मुलांची वसतीगृहे, व्यवसायाची ठिकाणे लक्ष्य केली जात आहेत. यामागे वेगवेगळे देश आणि साम्यवादी यांचे षड्यंत्र आहे. ‘हिंदु धर्म’ संपवावा, हा त्यामागील उद्देश आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते. जागतिक व्यवस्थेने आमच्या हिंदूंची मालमत्ता, जीवन, न्याय, हक्क, धार्मिकता यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जगद़्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. या वेळी त्यांनी बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्या अत्याचारांचा तीव्र निषेध केला.
जगद़्गुरु नरेंद्राचार्य महाराज पुढे म्हणाले की, हिंदू सहिष्णु आहेत, लाचार नाहीत. बांगलादेशातील घटनांवर भारतातील विविध पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. असाच नरसंहार तुम्ही चालू देणार का ? हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणला पाहिजे.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात