Menu Close

संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे मौन ही शरमेची गोष्‍ट

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पाकिस्‍तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा संताप !

भारतातील एकाही आजी-माजी जन्‍महिंदु क्रिकेटपटूने बांगलादेशातील हिंदूंविषयी विधान केलेले नाही, हे लक्षात घ्‍या ! अशा जन्‍महिंदूंना आपत्‍काळात वाचवायचे का ? -संपादक 

पाकिस्‍तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

कराची (पाकिस्‍तान) – पाकिस्‍तान क्रिकेट संघातील हिंदु असणारे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून सामाजिक माध्‍यमांतून पोस्‍ट करत संताप व्‍यक्‍त केला आहे. कनेरिया यांनी म्‍हटले, ‘हिंदूंवर होत असलेले अत्‍याचार पाहून माझे रक्‍त उकळत आहे. संयुक्‍त राष्‍ट्रे, संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी याविषयी बाळगलेले मौन ही शरमेची गोष्‍ट आहे.’ यासोबत त्‍यांनी ‘हॅशटॅग’मध्‍ये (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ‘सेव्‍ह बांगलादेशी हिंदू’ असे लिहिले आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News