Menu Close

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारक फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन

शिरवळ येथील व्याख्यान

पुणे (महाराष्ट्र) – क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ९ ऑगस्ट या दिवशी ठिकठिकाणी क्रांतीकारकांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या तरुण पिढीने क्रांतीकारकांच्या शौर्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक प्रशाला, शिरवळ, सातारा येथील व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. छाया पवार यांनी केले. या वेळी ५५० हून अधिक विद्यार्थी, मुख्याध्यापिका सौ. शोभा क्षीरसागर आणि शिक्षक उपस्थित होते.

क्रांतीकारकांची माहिती जाणून घेतांना शाळेतील विद्यार्थी

विशेष म्हणजे गेली २० वर्षे शाळेत साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू असून धर्मशिक्षण मिळावे; म्हणून सनातन संस्थेचे ग्रंथही ग्रंथालयात ठेवले आहेत. अशाच प्रकारचे आयोजन दिन दयाळ उपाध्याय शाळा कोथरूड, कर्वे स्त्री शिक्षण संस्था, नळ स्टॉप, एरंडवणे आदी ठिकाणी करण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

Related News