Menu Close

बिहारमध्ये सरकारी अनुदानावर चालणार्‍या मदरशांमध्ये शिकवली जातात पाकिस्तानात छापलेली पुस्तके

  • मदरशांमध्ये हिंदू ‘काफीर’ (नास्तिक) असल्याचे शिकवले जाते

  • मदरशांचा अभ्यासक्रम ‘युनिसेफ’ने बनवला

  • राज्याचा मदरसा बोर्ड विसर्जित करण्याची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची मागणी

(‘युनिसेफ’ म्हणजे ‘युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड’)

  • मदरशांना अनुदान देणार्‍या सरकारला तेथे काय शिकवले जाते ?, याकडे लक्ष कसे नाही ? कि मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ?
  • आता संपूर्ण देशातील मदरसे बंद करण्यासाठी हिंदूंनी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे ! -संपादक 
‘राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो

नवी देहली – बिहारमधील सरकारी अनुदान मिळणार्‍या काही मदरशांमध्ये धार्मिक कट्टरतावाद शिकवला जात आहे. येथे हिंदूंना ‘काफीर’ (मूर्तीपूजक, नास्तिक आदी) म्हटले जाते. येथे शिकवली जाणारी अनेक पुस्तके पाकिस्तानात छापली असल्याचे उघड झाले आहे. सरकारने मदरसा बोर्ड विसर्जित करावा, अशी मागणी ‘राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी केली आहे.

१. प्रियांक कानूनगो यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून काही पुस्तकांची छायाचित्रे प्रसारित करून लिहिले आहे की, ‘तालीम उल् इस्लाम’ आणि अशी इतर पुस्तके बिहार राज्यातील सरकारी अनुदानित मदरशांमध्ये शिकवली जात आहेत. या पुस्तकात मुसलमानेतर लोकांना ‘काफीर’ संबोधण्यात आले आहे. या मदरशांमध्ये हिंदू मुलांनाही प्रवेश दिला जातो, अशी माहिती मिळाली आहे; परंतु बिहार सरकार संख्येच्या प्रमाणाविषयी अधिकृत माहिती देत नाही.

२. ‘बिहार मदरसा बोर्डा’चा संदर्भ देत प्रियांक कानूनगो पुढे म्हणाले की, मदरशाचा अभ्यासक्रम ‘युनिसेफ’ने सिद्ध केला आहे. युनिसेफ आणि मदरसा बोर्ड यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लांगूलचालनाचे हे टोक आहे. बाल संरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून देणग्या आणि अनुदान घेऊन कट्टरतावादी अभ्यासक्रम सिद्ध करणे, हे ‘युनिसेफ’चे काम नाही. हे कृत्य भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे. याविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चौकशी आणि देखरेख करण्यात यावी.

३. प्रियांक कानूनगो पुढे म्हणाले की, मदरसा हे कोणत्याही स्वरूपात मुलांच्या मूलभूत शिक्षणाचे ठिकाण नाही. मुलांना शाळांमध्ये शिक्षण दिले पाहिजे. किमान मदरशांमध्ये हिंदू मुलांना शिक्षण देऊ नका. कानूनगो यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यासह संयुक्त राष्ट्रांना ‘टॅग’ (सूचित करणे) केले आहे.

पुस्तकांमध्ये काय छापले आहे ?

१. प्रियांक कानूनगो यांनी प्रसारित केलेल्या ‘स्क्रीनशॉट’वर ‘तालीम उल् इस्लाम’ (इस्लामचे शिक्षण) हे शीर्षक आहे. ‘तुला कुणी निर्माण केले?’ या पहिल्या प्रश्‍नाच्या उत्तरात ‘अल्लाने मला आणि जगातील सर्व काही निर्माण केले’, असे लिहिले आहे.

२. दुसरा प्रश्‍न असा होता की, ‘अल्लाने जग कसे निर्माण केले ?’ ज्याचे उत्तर ‘अल्लाने त्यांच्या सामर्थ्याने आणि आदेशाने जग निर्माण केले’, असे लिहिले आहे.

३. या पुस्तकात जे अल्लावर विश्‍वास ठेवत नाहीत त्यांना ‘काफीर’ आणि जे इतर कुणाची पूजा करतात त्यांना ‘मुश्रीक’ असे संबोधण्यात आले आहे.

४. याच पुस्तकात आणखी एक प्रश्‍न विचारण्यात आला आहे की, ‘बहुदेववादी (एकाहून अधिक देवांना मानणारे) मोक्ष प्राप्त करतात का ?’ उत्तरात ‘कधीच नाही’ असे लिहिले आहे. असेही म्हटले आहे की, बहुदेववाद्यांना शिक्षा दिली जाते.

५. याखेरीज पुस्तकांच्या अनेक पानांवर इस्लामी चिन्हे छापलेली आहेत. या चिन्हांमध्ये सौदी अरेबियाची मशीद ‘अल् नवाबी’चाही समावेश आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News