Menu Close

मध्यप्रदेशात रेल्वे रूळावर ठेवण्यात आल्या होत्या लोखंडी पट्ट्या

मोठा अपघात टळला ; घातपाताची शक्यता

हा ‘रेल्वे जिहाद’ आहे का ?, याचा शोध घेतला पाहिजे. एखादा बाँबस्फोट घडवण्यापेक्षा अशा प्रकारे अघपात घडवल्यास मोठी हानी होऊ शकते आणि अगदी कमी श्रमात, पैशांत आणि मनुष्यबळात होऊ शकत असल्याने सरकारने आता याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे ! -संपादक 

रेल्वे रूळावर ठेवण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्या

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील जबलपूर-नागपूर मार्गावरील कचपुरा रेल्वेस्थानजवळील रूळावर १५ फूट लांबीच्या ३ लोखंडी पट्ट्या ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने मोठा अपघात टळळा. या वेळी या मार्गावरून जाणार्‍या रेल्वे गाडीचा वेग अल्प असल्याने पट्ट्या पाहिल्यानंतर गाडी आधीच थांबवण्यात आली. जर रेल्वे गाडी या पट्ट्यांवरून गेली असती, तर डबे घसरले असते आणि जीवित हानी होऊ शकली असती.

काही दिवसांपूर्वी कानपूर येथे साबरमती एक्सप्रेस रूळावरून घसरली होती. यामागे रूळांवर काहीतरी ठेवण्यात आल्याचे लोको पायलटकडून (चालककडून) सांगण्यात आले होते. यावरून रेल्वेचे अपघात घडवण्यामागे मोठे षड्यंत्र असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News