Menu Close

स्वत:च्या सर्वांगीण विकासाची जिज्ञासा जागृत ठेवावी – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भिलवाडा (राजस्थान) येथे भारत विकास परिषदेच्या वतीने ‘गुरुवंदन विद्यार्थी अभिनंदन कार्यक्रमा’चे आयोजन

उपस्थित विद्यार्थी

भिलवाडा (राजस्थान) – शाळेत केवळ व्यावहारिक जीवनासाठी आवश्यक ज्ञान दिले जाते; परंतु आदर्श विद्या मंदिरामध्ये जीवनात उपयोगी पडणारे संस्कारही शिकवले जातात. आपल्या मानसिक, बौद्धिक आणि व्यावहारिक प्रगतीसमवेतच आध्यात्मिक प्रगतीही होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सर्वांगीण प्रगतीची जिज्ञासा कायम जागृत जिवंत ठेवावी, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी काढले.

श्री. आनंद जाखोटिया

‘भारत विकास परिषदे’च्या स्वामी विवेकानंद शाखेच्या वतीने येथील आदर्श विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ‘गुरुवंदन विद्यार्थी अभिनंदन कार्यक्रमा’त ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. या वेळी राजस्थान मध्यप्रांताचे माजी अध्यक्ष श्री. पारसमल बोहरा यांनी भारत विकास परिषदेची माहिती दिली. या वेळी राजस्थान मध्य प्रांताध्यक्ष श्री. गोविंद प्रसाद सोडानी, राजस्थान मध्यप्रांताचे माजी अध्यक्ष श्री. कैलास अजमेरा, शाखाध्यक्ष श्री. बालमुकुंद दाड, शाखा सचिव श्री. गिरीश अग्रवाल आणि शाखेचे वित्त सचिव श्री. भेरूलाल अजमेरा उपस्थित होते.

श्री. जाखोटिया पुढे म्हणाले, ‘‘प्राचीन काळी गुरुकुलांमध्ये सर्वांगीण शिक्षण दिले जात होते. त्यामुळे जीवनातील प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे धैर्य विद्यार्थीदशेतच मिळायचे. श्रीकृष्ण-अर्जुन, चंद्रगुप्त-चाणक्य यांसारख्या आपल्या अनेक गुरु-शिष्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे.’’

Related News