Menu Close

भिलवाडा (राजस्थान) येथील महामंडलेश्वर हंसारामजी महाराज यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद

भिलवाडा (राजस्थान) – हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. संदीप काबरा यांनी ‘उदासीन आखाड्या’चे महामंडलेश्वर हंसाराम उदासीन महाराज यांची सदिच्छा भेट घेत समितीच्या धर्मकार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी महाराजांनी समितीच्या कार्याचा गौरव केला, तसेच ‘हरिशेवा उदासीन आश्रमा’त होणार्‍या विविध कार्यक्रमांमध्ये समितीला धर्मप्रसार करण्यासाठी निमंत्रण दिले. याप्रसंगी महामंडलेश्वर हंसाराम उदासीन महाराज यांनी आश्रमाचे विविध उपक्रम, तसेच सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी आश्रम करत असलेल्या कार्याची माहिती दिली.

Related News