Menu Close

गुजरात विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक संमत

या कायद्याद्वारे श्रद्धेचे निर्मूलन करण्‍याचा प्रयत्न कुणी करू नये, याकडे सरकारने लक्ष द्यावे ! -संपादक 

गुजरात विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक

कर्णावती (गुजरात) : गुजरातच्‍या विधानसभेत ‘नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी अन् दुष्‍कर्मी प्रथा आणि जादूटोणा (काळी जादू) अधिनियम (२०२४)’ हे विधेयक संमत करण्‍यात आले. गृहराज्‍यमंत्री हर्ष संघवी यांनी म्‍हटले आहे की, नरबळी आणि काळी जादू यांच्‍या दुष्‍ट प्रथेमुळे सामान्‍य लोकांचे शोषण होण्‍याच्‍या चिंताजनक घटना समोर आल्‍या आहेत. काळी जादू आणि त्‍यातून होणार्‍या फसवणुकीला बळी पडण्‍यापासून सामान्‍य लोकांना वाचवण्‍यासाठी हा कायदा करण्‍यात येत आहे. हा कायदा गैरफायदा घेणार्‍या स्‍वयंघोषित बुवांसाठी आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News