Menu Close

आसाममध्ये ४३ वर्षांत घुसखोरी केलेल्या ४७ सहस्र ९२८ बांगलादेशींपैकी ५६ टक्के मुसलमान – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची विधानसभेत माहिती

  • ही सरकारी आकडेवारी आहे. प्रत्यक्षात किती मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख जोगिंदर सिंह यांच्या मतानुसार, ‘एकट्या आसाममध्ये तब्बल १ कोटी मुसलमान घुसखोर रहातात.’ यावरून घुसखोरीच्या समस्येची भयावहता लक्षात येईल !
  • मुख्यमंत्री सरमा यांनी काही मासांपूर्वी केलेल्या दाव्यानुसार, ‘आसाममधील ४० विधानसभा मतदारसंघांत आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचे ?’, हे बांगलादेशी घुसखोर ठरवतात. यावरूनही घुसखोरीचे वास्तव लक्षात येईल !
  • गेल्या ५ दशकांत घुसखोरीची समस्या सोडवू न शकरे, हे आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! -संपादक 
मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये अनुमाने ४८ सहस्र घुसखोरांची ओळख पटली असून त्यांपैकी ५६ टक्के घुसखोर हे मुसलमान आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी घुसखोरांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली. ते म्हणाले की, वर्ष १९७१ ते २०१४ या ४३ वर्षांच्या कालावधीत राज्यात ४७ सहस्र ९२८ बांगलादेशी घुसले. शासनाच्या विदेशी लवादाने या सर्वांना ‘विदेशी’ घोषित केले आहे. यांपैकी ५६ टक्के, म्हणजे २७ सहस्र ३०९ मुसलमान आहेत, तर २० सहस्र ६१३ हिंदू आहेत.

मुख्यमंत्री  पुढे म्हणाले की,

१. मुसलमान घुसखोरांपैकी सर्वाधिक ४ सहस्र १८२ घुसखोर हे एकट्या जोरहाट जिल्ह्यात आहेत, तर गौहत्ती शहरात ३ सहस्र ८९७ मुसलमान घुसखोरांची ओळख पटली आहे.

२. दिब्रुगड २ सहस्र ७८२, तर होजई, शिवसनगर, नागाव आणि कछार येथे प्रत्येकी २ सहस्रांहून अधिक मुसलमान घुसखोर रहात आहेत.

३. बांगलादेशातून येणार्‍या हिंदूंची सर्वाधिक संख्या कचर, गौहत्ती आणि लखीमपूर या जिल्ह्यांमध्ये आहे.

४. वर्ष १९७१ मध्ये भारतात आलेल्या घुसखोरांची ओळख पटवण्यामागील कारण म्हणजे ‘वर्ष १९८५ मध्ये झालेला आसाम करार.’ या करारानुसार वर्ष १९७१ मध्ये राज्यात अवैधपणे घुसलेल्या लोकांना घुसखोर मानले जाईल.

५. राज्यातील ७२ टक्के लोक आसामी बोलतात, तर २८ टक्के बंगाली बोलतात.

हिंदू नाही, तर मुसलमान भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात ! – मुख्यमंत्री सरमा

मुख्यमंत्री सरमा

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथे हिंदू लढत आहेत, तर मुसलमान पळून जाऊन भारतात घुसखोरी करत आहेत. केवळ गेल्या एका महिन्यात ३५ बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत बांगलादेशातून एकही हिंदू भारतात आला नाही. अलीकडेच आसाममधील करीमगंज येथे दोघांना अटक करून परत पाठवण्यात आले. तेथील हिंदु समुदाय भारतात घुसण्याचा प्रयत्न करत नाही, तर मुसलमान घुसण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. (मुसलमानांना सर्वत्र ‘दारुल इस्लाम’ची (इस्लामी राज्याची) स्थापना करायची असल्यानेच ते कितीही गरीब असले, तरी ‘दारुल हरब’ (इस्लामेतर प्रांत) असलेल्या स्थानी जातात, हे वास्तव जाणा ! – संपादक)

ते पुढे म्हणाले की, बांगलादेशी मुसलमानांना आसाममार्गे बेंगळुरू आणि तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे जायचे आहे. मासूम खान आणि सोनिया अख्तर या दोन बांगलादेशींनाही वरील दोन शहरांत कापड उद्योगासाठी जायचे होते. मासूम बांगलादेशातील मॉडेलगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात रहातो, तर सोनिया ढाक्याची रहिवासी आहे. त्या दोघांना आसाम पोलिसांनी अटक केली.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News