Menu Close

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन

हिंदु जनआक्रोश सभेतच्या व्यासपिठावर उपस्थित असलेले विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी

भाग्यनगर (तेलंगाणा) – बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. त्यामुळे हिंदु समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील हिंदु समाज आणि मंदिरे यांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी भाग्यनगर येथील धरणा चौकात हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.

यात एकता मंच, हनुमान चालिसा गट, ग्लोबल हिंदु ह्युमन राइट्स कलेक्टिव्ह, सनातन हिंदु संघ, एच्२एच्, भारतीय सनातन संघ, धर्म रक्षा, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवसेना, विश्‍व धर्म परिरक्षण वेदिका, जे.एस्.आर्.एस्, भारतीय जनता युवा मोर्चा, हिंदुवाहिनी, अखिल भारतीय गो सेवा फाऊंडेशन, छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन, विश्‍व हिंदु महासंघ आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या.

Related News