Menu Close

त्रिपुरामध्‍ये श्री कालीमातेच्‍या मंदिरातील मूर्तीच्‍या तोडफोडीनंतर हिंसाचार

घरे, वाहने यांची जाळपोळ : ६ जण घायाळ

हिंदूबहुल देशात हिंदूंच्‍या मंदिरांवर, देवतांच्‍या मूर्तीवर आक्रमणे होतात, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! मंदिरांचे रक्षण करू न शकणार्‍या हिंदूंचे देवतांनी तरी का रक्षण करावे ? -संपादक 

घरांची जाळपोळ

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुराच्‍या पश्‍चिम भागात असलेल्‍या रानीरबाजारच्‍या कात्राईबारी गावामध्‍ये श्री कालीमातेच्‍या मंदिराची तोडफोड करण्‍यात आल्‍याची घटना २५ ऑगस्‍टला घडली. त्‍यानंतर येथे हिंसाचार झाला. यात ६ जण घायाळ झाले. येथे घरे आणि वाहने यांची तोडफोड अन् जाळपोळ करण्‍यात आली. सध्‍या या परिसरात संचारबंदी लागू करण्‍यात आली असून अतिरिक्‍त पोलीस तैनात करण्‍यात आले आहेत.

येथील श्री कालीमातेचे मंदिर गावकर्‍यांच्‍या श्रद्धेचे मुख्‍य केंद्र आहे. हे मंदिर ३० वर्षे जुने असल्‍याचे सांगितले जाते. २५ ऑगस्‍टच्‍या सकाळी भाविक पूजेसाठी या मंदिरात पोचले, तेव्‍हा त्‍यांना श्री कालीमातेच्‍या मूर्तीचे डोके तोडलेले दिसले. काही वेळातच या घटनेची बातमी सर्वत्र पसरली आणि नंतर हिंसाचार चालू झाला. यात ९ घरांना आग लावण्‍यात आली, तर ६ घरे लुटण्‍यात आली. १२ दुचाकी आणि चारचाकी गाड्या जाळण्‍यात आल्‍या.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News