Menu Close

भिलवाडा (राजस्थान) येथील ‘निंबार्क आश्रमा’चे महंत मोहन शरण महाराज यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

भिलवाडा (राजस्थान) – हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. संदीप काबरा यांनी येथील ‘निंबार्क आश्रमा’चे महंत मोहन शरण महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. जाखोटिया यांनी त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समिती करत असलेल्या कार्याची माहिती दिली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

या वेळी ‘हिंदु जनजागृती समिती सध्याच्या काळाप्रमाणे महत्त्वाचे काम करत आहे’, असे महंत मोहन शरण महाराज म्हणाले. या निमित्ताने महंत मोहन शरण महाराज यांनी श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. संदीप काबरा यांचा सत्कार केला.

Related News