Menu Close

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार

कोलकाता (बंगाल) – कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील सत्य घटनांवर आधारित चित्रपट ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली आहे. याचिकाकर्ते राजीव कुमार झा यांचा दावा केला आहे की, ‘या चित्रपटात राज्य प्रशासनावर टीका करण्यात आली असून चित्रपटामुळे धार्मिक सौहार्दाला हानी पोचवू शकते.’ या प्रकरणावर ३ आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयाकडे अनेक गंभीर प्रकरणे आहेत ! – याचिकाकर्त्याला फटकारले

कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले की, पुस्तक किंवा चित्रपट यांवर बंदी घालण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश आहेत. तुम्ही इच्छित असाल, तर चित्रपट पहा किंवा नका पाहू. कोणतीही व्यक्ती तुम्हाला करण्यासाठी भाग पाडत नाही. एका लोकशाही देशात ही सामान्य गोष्ट आहे. जर कुणी कुणावर टीका करत असेल, तर तो त्याचा अधिकार आहे. अशा प्रकारच्या जनहिताच्या प्रकरणांनी आमच्याकडे गर्दी केली आहे. कालच कुणाला तरी याविषयी आम्ही चेतावणी दिली होती. याखेरीज न्यायालयाकडे अनेक गंभीर प्रकरणे आहेत. देशातील जनता फार सहिष्णु आहे. चित्रपट पहाणे किंवा न पहाणे, हे त्यांच्या विवेकावर सोडून द्या.

चित्रपट बनवण्यापेक्षा प्रदर्शनासाठी श्रम करावे लागत आहेत ! – दिग्दर्शक सनोज मिश्रा

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मुंबईत सांगितले की, आम्ही जितक्या श्रमाद्वारे हा चित्रपट बनवला आहे, त्यापेक्षा अधिक श्रम आम्हाला त्याच्या प्रदर्शनासाठी करावे लागत आहेत. चित्रपटातील अनेक प्रसंग आम्हाला पुन्हा चित्रित करावे लागले. आम्ही हा चित्रपट ‘केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाकडे फार पूर्वीच पुनरावलोकनासाठी पाठवला होता. त्यांच्याकडून येण्यासाठी आम्हाला प्रतीक्षा करावी लागली.

काय आहे या चित्रपटात ?

या चित्रपटात बांगलादेशातून भारतात होणारी मुसलमानांची घुसखोरी, रोहिंग्या निर्वासितांचे संकट, लव्ह जिहाद आणि समाजातील आंतरधर्मीय किंवा आंतरधर्मीय संबंध यांविषयीच्यासत्य घटनांवर आधारित गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News